Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ब्लॅकमेलींग करत मुलीवर अत्याचार;दोन नराधमांसह मदत करणाऱ्यांवर गुन्हा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/07/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
ब्लॅकमेलींग करत मुलीवर अत्याचार;दोन नराधमांसह मदत करणाऱ्यांवर गुन्हा

जामनेर-(प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत नाहीय. अशातच अल्पवयीन मुलीला आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर दोघांनी अत्याचार केला. ही धक्कादायक घटना जामनेर तालुक्यात घडली असून याबाबत दोन नराधमांसह त्यांना मदत करणार्‍या इतर दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना?

जामनेर शहरात वास्तव्याला असणार्‍या आणि घरकाम करणार्‍या १७ वर्षाच्या तरूणीला तालुक्यातील तोरनाळा येथील आकाश सुरेश मुरळकर याने २ एप्रिल रोजी धमकावून बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले. याप्रसंगी व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. यानंतर आकाशचा मित्र तुषार सोन्नी ( रा. चिंचोली पिंप्री, ता. जामनेर ) याने १२ जून २०२२ रोजी बुलढाणा येथील एका कॅफेमध्ये अत्याचार केले. याप्रसंगी देखील व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.

सदर तरूणीने ही बाब आपल्या पालकांना सांगितल्यानंतर या प्रकरणी आकाश सुरेश मुरळकर ( रा. तोरनाळा ) आणि तुषार सोन्नी ( रा. चिंचोली पिंप्री, ता. जामनेर) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात त्यांना अजून दोघांनी मदत केली. यात एका तरूणीचाही समावेश असल्याची धक्कादायक बाब आहे. त्या तरूणीसह जामनेर येथील रहिवासी योगेश लोणारी याच्या विरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चारही जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

दिव्यांग तपासणीसाठी कोणाला पैसे देऊ नका;पथनाट्यातुन दिला संदेश

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १८ जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्ध होणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo