<
आघाडीवर उभा राहाणारा आणि संघाच्या पाठीशी असणारा नेता दोन्ही नेतृत्वाचे पैलू-शब्बीर शकीर डी जी रोटरी
जळगाव – (प्रतिनिधी) – आय एम आर मध्ये रोटरी तर्फे लिडरशीप डेव्हलपमेंट वर व्याख्यान झाले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे रोटरी इंटर नॅशनलचे ३०३ चे डि जी शब्बीर शकीर आणि रोटरी गोल्ड चे अध्यक्ष सुनिल अडवाणी आणि निखिल चौधरी तसेच आय एम आर च्या डायरेक्टर प्रा डॉ शिल्पा बेंडाळे उपस्थित होते. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ शिल्पा बेंडाळे यांनी यांनी उपजत नेतृत्वाच्या पैलूंना उळवण्यासाठी सुयोग्य मार्गदर्शनाची गरज अधोरेखित केली.
त्यानंतर बोलतांना की नोट स्पिकर, रोटरी डी जी, शकीर यांनी ” आघाडीवर उभा राहाणारा आणि संघाच्या पाठीशी असणारा नेता दोन्ही नेतृत्वाचे पैलू” ह्या नेतृत्वाच्या नाण्याच्या दोन्ही बाजू विस्तृतपणे विद्यार्थींशी चर्चिल्यात. जिथे पाॅवर इफेक्ट नसतो तरीही नाही तरीही टीम मागे उभे राहून सपोर्ट करते तो खरा नेता निर्विवाद ओळखावा असे सांगितले.
जेव्हा केव्हा आरसा उचलाल तेव्हा आधी स्वतःची प्रतिमा स्वतः तपासा आणि इतरांना दाखवा. तुमचे शब्द आणि बुद्धी संपूर्ण दुनियेला जिंकू शकतात पण ह्रदय जिंकायचा मार्ग ह्रदयातूनच जातो. हे चांगला नेता उत्तमरितीने ओळखतो. चांगल्या उद्यासाठी लक्षात ठेवा, क्रिया प्रतिक्रिया आणि प्रतिसाद महत्त्वाचा आहे. रोज रात्री आजचा दिवस analysed करा. शिव्या देणार्याला कधीही respond करू नका. चार तासांनी तुम्हाला बरे वाटेल. आमच्या पालक म्हणून अपेक्षा काय असतात? बॅट घेऊन छोटा मुलगा बाहेर पडतो तेव्हा आईवडील ना वाटते की तो विराट कोहीली बनुनच बाहेर यायला हवा. अनरिअलॅस्टिक अपेक्षा नेहमीच असतात. पण या नाण्याची दुसरी बाजू अशीही आहे की, या अपेक्षा का आहेत?कारण त्या पुर्ण करायची तुम्ही हिम्मत ठेवतात. कार्यक्रमाची प्रस्थावना डॉ ममता दहाड यांनी तर सुत्रसंचलन आणि आभारप्रदर्शन जयश्री महाजन ह्यांनी केले.