<
जळगांव:-विधानसभा निवडणुकी साठीची आचारसंहिता येत्या १९ तारखे नंतर सुरू होत आहे.आता ज्या प्रमाणे लोकसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक झाल्या तश्याच प्रकारे विधानसभेच्या ही निवडणुकी साठी शेवटच्या क्षणापर्यंत व वेळ पर्यंत अधिकृत पक्षाचे अधिकृत उमेदवार अर्ज भरतील.खरं तर या निवडणूकीत पक्षप्रमुख कुणावर विश्वास ठेवून पक्षाची ताकद वाढवतील यावर सर्व ठरलेलं असेल.जिल्ह्यातील विद्यमान आमदारांना उमेदवारी न देण्याची ची अट घालून अगोदरच पक्ष श्रेष्टीनी अडचणीत टाकल्याने त्यामुळं इच्छुक उमेदवार सुद्धा पडद्याआड उमेदवारी उभी करू पाहतील.आपण पाहिले आहे की भाजप-सेना, काँग्रेस -राष्ट्रवादी, व इतर पक्षाची अवस्था जळगांव निवडणूक साठी अवघड अशीच आहे,आणि सोबत या चारही पक्षाच्या नेतृत्वाच्या अभावाने जवळ जवळ सर्वच मतदारसंघात चिंता जनक वातावरण आहे. सत्तेचे पारडे वजनाने युती पक्ष्यांकडे झुकल्याने पक्ष सोडणाऱ्या व पक्ष धरणाऱ्या सत्ता पिपासू ,आयाराम गयाराम समर्थक व पक्षप्रेमींना मैदानात उतरवत विरोधी पक्षाच्या नेत्या सोबत बंडखोरी चे राजकारण खेळले जात आहे.त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांना येत्या विधानसभेच्या निवडणुकीत मोठया आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. जळगावात युती सरकारच्या बाजूने तयार झालेले वातावरण पाहिले असता काही नवीन जुन्या नेतृत्वानी आणि पाजशाच्या आजी माजी समर्थकांनी भाजपात प्रवेश करत, आपल्या पूर्वलक्षी राजकीय पक्षांना रामराम ठोकला आहे. याचे एकमेव कारण आहे आणि ते म्हणजे , साखर कारखाणे, उद्योग, कंत्राक, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था,वैद्यकीय व्यवसाय,जमीन खरेदी विक्री व्यवसाय यावर राजकीय विज्ञान रेंगाळत असतात आणि सत्तेच्या विरोधात राहून या सर्व बाबी टिकवणे शक्य नसते त्याच बरोबर भ्रष्टाचाराच्या विषयी कारवाई टाळणे, विरोध करणे सोडणे व आपल्या सर्व पैसा मिळवून देणाऱ्या सत्ता टिकवणे अवघड जाते. म्हणून सर्व आजी माजी समर्थक भाजप सेनेत प्रवेशाला प्राधान्य देत असल्याचं चित्र दिसत आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करतांना आपल्या जळगांव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक, सामाजिक,धार्मिक, शेतकरी मजूर बेरोजगारी ,प्रामाणिक प्रशासन सेवे च्या विकासासाठी जळगांव च्या मतदाराने मीमांसा करणे चिंतन व मनन करणे गरजेचे आहे.शैक्षणिक क्षेत्रात जळगाव अव्वल असतांना सुद्धा विद्यार्थ्याना प्रश्नासाठी हक्का साठी विद्यापीठात उपोषणाला बसावे लागते, राजकीय क्षेत्रात सर्वात जास्त प्रतिनिधी देणाऱ्या जळगाव जिल्ह्यात दुमत व आमदार खासदार नगरसेवक अश्या निष्क्रिय नेतृत्वामुळे जळगांव ची राजकीय प्रतिष्ठा डबघाईला आली आहे. विकासाच्या बाबतीत हात घालता असे दिसते की अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजा अजूनही जिल्ह्यातील जनतेच्या समस्या समोर आ करून उभ्या आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत,त्याच्या अनुदानावर डल्ला मारून पोट भरणारी जमात येथे पाहायला मिळाली हे थोर नशीब आहे ,सरसकट कर्ज माफ करण्याचे आदेश असतांनाही अजूनही त्यावर अंबलबजावणी नाही. बेरोजगारीची ही व्यथा आहे, हजारो तरुण सुशिक्षित असून ही हाताला काम नाही, काही अंशी नोकऱ्या निघाल्या तरी मात्र तूर्तास बंदी आणली जाते.तर प्रायव्हेट नोकरी करणाऱ्या रोजगार लोकांना अटी तटीवर कामवरून हाकलून लावले जाते ;आणि तरुणाच्या अपेक्षावर पाणी फिरवले जात असल्याचा चित्र जळगाव जिल्ह्यात आजही पाहायला मिळत आहे. अश्या अनेक प्रश्नावर इथला आमदार खासदार, पालकमंत्री आणी सरकार काही एक बोलायला तयार नसतो. मग आम्ही कुणाकडे जावं,कुणाकडे गार्हाणे मांडावे, शासन प्रशासन आपल्या अधिकारच्या सीमा संकुचित करून पक्ष आदेश पाळतात मग आम्ही कशासाठी या जळगाव शहरात जगतोराहतो, वावरतो,आणि विव्हळतो आहोत याची मीमांसा, चिंतन, आणि मनन झाले पाहिजे. विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीत मतदान करताना वरील सर्व बाबी चा विचार करूनच मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.जिल्ह्यातील हूडको कर्ज,समांतर रस्ते,जिल्हा बॅंक कर्ज,गाडेधारकांचे प्रश्न, खड्डेमय जळगाव च्या आर्त व्यथा, आणि घरकुल घोटाळा यावर जरी काही अंशी तोडगे निघाले असली तरी मात्र अजूनही त्यावर कायमस्वरूपी खंबीर बोलणे शक्य नाही. प्रशासकीय यंत्रणेला, शासनाला प्रश्न विचारणारे, नेत्यांना कर्तव्याची जाण करून देणारे,शेतकरी वंचित आणि न्यायासाठी हतबल माणसाच्या साठी आवाज उठवणारे,उपोषण आंदोलन करून शासनाला आणि राजकरण्याना सळो की पळो करणारे ,आणि राजकीय पक्षाहुन ही अधिक सटीक, सरस आणि प्रामाणिक काम करणारे,पैसे देत नाही पैसे घेत नाही त्याच बरोबर मी कुणाचा दबलेला नाही ,मला विकासासाठी कुणीही रोखणारा नाही असं ठणकावून सांगणारे, कायदा राजकारण समाजकारण धार्मिक आणि सर्वांगीण ज्ञानाची शिदोरी असलेलं नेतृत्वास आपण निवडून दिल पाहिजे.
लेखक:- डॉ धर्मेश पालवे ७२७६४९०१६७(समाजीक कार्यकर्ता तथा पत्रकार – सत्यमेव जयते)