<
जळगाव, (प्रतिनिधी) – दि पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, प्रेमनगर, जळगाव या विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.डी.एस. पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक श्री.डी.बी. सोनवणे उपस्थित होते. प्रारंभी मुख्याध्यापक श्री.डी.एस. पाटील यांच्याहस्ते महर्षी व्यासमुनी व माता सरस्वती यांच्या प्रतिमेस माल्यार्पपण करण्यात आले.
उपस्थित माता-पालक यांचे प्रातिनिधीक स्वरुपात विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त पूजन करुन औक्षण केले. याप्रसंगी भावनिक वातावरण निर्माण झाले होते. त्याचबरोबर हरितसेनेकडून उपस्थित माता-पालकांना रोपे देवून मुख्याध्यापकांनी त्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक श्री.एम.ए. वाणी यांनी केले. मुख्याध्यापकांनी गुरुपौर्णिमेचे महत्व विषद केले. तसेच डीआयडी लिटील मास्टर सागर वर्पे या विद्यार्थ्याची कल्याणी काकडे, दिशा फुलमाळी, साक्षी गवळे यांनी मुलाखत घेतली. तसेच विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न विचारुन शंकांचे समाधान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.समिधा सोवनी यांनी केले. तर आभार श्री.एस.जी. चौधरी यांनी मानले. यशस्वीतेसाठी श्री.ऋषिकेश पाटील, श्री.विष्णु साबळे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.