<
हिंगोणा – (प्रतिनिधी) – आज दिनांक १४ जुलै २०२२ वार गुरुवार रोजी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी हिंगोणा तालुका यावल येथे डॉ. कुंदनदादा फेगडे मित्र परिवारातर्फे आयोजित निशुल्क नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले.
सदर शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी करण्यात आली या वेळी ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहे अशा रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना ऑपरेशन साठी कांताई नेत्रालय जळगाव येथे रवाना केले गेले इतर रुग्णांना योग्य सल्ला व मार्गदर्शन आणि उपचार केले गेले. डॉ. कुंदन फेगडे मित्र परिवार व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या वतीने रुग्णांची जाण्या येण्याची, राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली. या शिबिरात एकूण ८० नेत्र रुग्णांची तपासणी व ०९ रुग्णांची मोतीबिंदू शास्त्रक्रिया साठी कांताई नेत्रालय जळगाव येथे पाठविण्यात आले.
सदरील शिबिरात कांताई नेत्रालय जळगाव येथील शिबीर नियोजक युवराज देसर्डा यांनी मार्गदर्शन केले. व नेत्र चिकित्सक डॉ संजू शुक्ला यांनी रुग्ण बांधवांची तपासणी केली. या वेळी श्री सागर महाजम उर्फ शामभाऊ व युवराज देसर्डा यांनी रुग्णांना आपल्या मनोगतातून योग्य मार्गदर्शन सल्ला दिला या वेळी डॉ कुंदनदादा फेगडे यांच्या मध्येमातून जास्तीत जास्त जनसेवा व रुग्ण सेवा व्हावी व जनतेची सेवा त्यांच्या व मित्रपरिवाराच्या मध्येमातून या पुढे ही होत राहावी अशी प्रार्थना श्री सागर महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केली.व संपूर्ण मित्र परिवाराचे गावाच्या वतीने आभार व्यक्त केले व आता पर्यंत २६ शिबीर हे आमच्याडॉ. कुंदन दादा फेगडे मित्र परिवाराच्या सहकार्याने यावल तालुक्यात घेण्यात आले . या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विविध कार्यकारीसहकारी सोसायटी चे चेअरमन श्री सागर महाजन होते.
तर कार्यक्रमाचे उद्धघाटन श्री. व्हा चेअरमन संतोष सावळे यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करून कार्यक्रमाचे उद्धघाटन करण्यात आले या प्रसंगी हिंगोणा गावाचे सरपंच श्री फिरोज तडवी विकसो चेअरमन श्री सागर महाजन उर्फ शामभाऊ व्हाईस चेअरमन श्री संतोष सावळे संचालक श्री विष्णू महाजन श्री मनोज वायकोळे,सचिव श्री विजयसिंह पाटीलश्री सुभाष गाजरे चंद्रकांत महाजन युवराज गाजरे श्री हर्षल धनगर श्री भगवान पाटील श्री तुषार कोळी, श्री हरेश भोळे श्री गौरव बाविस्करआदींची उपस्थिती होती, या शिबिरा साठी सागर लोहार, मनोज बारी विशाल बारी रितेश बारी कुंदन दादा फेगडे मित्र परिवार आदींनी परिश्रम घेतले.