<
जळगाव दि.19- ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात चला संशोधक बनू या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे होत्या . चला संशोधक बनू या हे शिबिर विज्ञान विषयावर असून शिबिराचे उद्घाटन मुळजी जेठा महाविद्यालयाच्या वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर एम. झेड. चोपडा यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी त्यांनी संशोधक वृत्ती कशी वाढवावी तसेच तसेच विद्यार्थ्यांनी निरीक्षण शक्ती वाढवणे आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमात शिबिराचे आयोजन करण्यामागचा उद्देश शिबिर प्रमुख एम एस नेमाडे यांनी सांगितला या शिबिराचा लाभ इयत्ता पाचवी ते नववीचे विज्ञान प्रेमी विद्यार्थी घेत आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे पर्यवेक्षक एन बी पालवे, सतीश भोळे, केलेपी.आर.राणे, श्रीमती एम वाय ठोसरे, सौ एस. जे. कोल्हे, सी.बी. राणे यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहीणी पाटील यांनी तर आभार पी.आर कोल्हे यांनी केले.