<
जळगाव – (प्रतिनिधी) – आज दि.२१/०७/२०२२ गुरुवार रोजी ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात रोटरी क्लबच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी इंटरँक्ट क्लब स्थापन करण्यात आला याप्रसंगी रोटरी क्लब जळगाव प्रेसिडेंट मा.श्री. राजेश वेद, सेक्रेटरी मा.श्री. सुभाष अमळनेरकर व कमिटी चेअरमन व प्रकल्प सम्नवयक मा.श्री. पंकज व्यवहारे शाळेच्या मुख्याध्यापिका मा.श्रीमती प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक मा.श्री. नरेंद्र पालवे ,शालेय इंटरँक्ट क्लब सम्नवयक मा.श्री. अतुल पाटील सर ,एन.सी.सी.कमांडर श्रीमती रोहिणी पाटील ,माजी शालेय प्रकल्प सम्नवयक श्रीमती वर्षा राणे यांच्या हस्ते नूतन अध्यक्षपदी ब्रम्हक्षत्रिय अथर्व प्रकाश
उपाध्यक्ष धनश्री विजय रोकडे सचिव प्रणाली चंद्रकांत नारखेडे सदस्यपदी धनंजय दामोदर चौधरी, कुणाल विनोद पाटील, स्रुष्टी विशाल कुलकर्णी, उत्कर्ष देवेंद्र शिंदे, चेतना योगेंद्र काळुंखे,डिगंबर शेखर पाटील, साक्षी सतीश इंगळे,आर्यन राहुल शिरसाट या नुतन पदाधिकारी यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी नुतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी आम्ही समाजाचे काही देण लागतो व आदर्श समाज व देशाचे जबाबदार नागरिक घडवू या भावना व्यक्त केल्या.यावेळी श्री. राजेश वेद ,श्री. पंकज व्यवहारे यांनी क्लबचे उदिष्ट व कार्य आपल्या प्रस्तावनेमध्ये मांडले.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.प्रणिता झांबरे यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्प व आपल्यात असलेल्या नेतृत्व गुण व सुप्त कला कौशल्य विकसित करण्याचे आव्हान केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. चंद्रकांत कोळी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. अतुल पाटील सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कलाशिक्षक श्री. सतीश भोळे,संगीतशिक्षक श्री. प्रविण महाजन व शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. अशोक तायडे, श्री. चंदन खरे व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.