<
देशी प्रजातीच्या झाडांच्या रोपांचे होणार निशुल्क वाटप
जळगाव – (प्रतिनिधी) – भुसावळ शहराच्या इतिहासात १७ एप्रिल २०२२ रोजी सर्वाधिक ४८ डि.से. तापमानाची नोंद जगात झाली आहे.तापमानाचे हे जागतिक संकट आणि त्यातल्या त्यात भुसावळ वासियांवर असलेले हे संकट लक्षात घेता अंतर्नाद प्रतिष्ठानने भुसावळ शहरात वृक्षारोपणाची चळवळ राबविण्यासाठी ‘’एक वृक्ष आपला जीवनदाता’’ ह्या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन केले आहे.या उपक्रमा अंतर्गत १५० रोपांचे निशुल्क वाटप इच्छुक पर्यावरण प्रेमींना करण्यात येणार आहे.
अनेकांना वृक्षारोपणाची इच्छा असते परंतु त्यांना रोप उपलब्ध होत नाहीत, अश्याना अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे रोप पुरवली जाणार आहेत.यात वड, पिंपळ, कडुलिंब, शिसम, बकुळ, करंज, चिंच या देशी प्रजातीच्या झाडांची रोपे दिली जाणार आहेत.यासाठी प्रथम https://forms.gle/mnLDNW5nhTrMKYK69 या लिंक वर टच करून रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.या नंतर २४ जुलै रविवारी सकाळी ९ वाजता विमल पाटील उद्यान, भुसावळ येथे रोपे वाटप करण्यात येणार आहे.रोप घेणाऱ्या व्यक्तीने वृक्षाची जबाबदारी घेऊन त्याचे संगोपन करावे आणि सहा महिन्यानंतर तसेच पुन्हा पुढील वर्षी त्याचा एक फोटो अंतर्नाद प्रतिष्ठानकडे पाठवावा. हे फोटो अंतर्नाद प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवरती प्रसिद्ध करण्यात येतील तसेच यातील चांगले संगोपन करणाऱ्या तसेच प्रथम फोटो पाठविणाऱ्या ११ व्यक्तींचा सन्मान पुढीलवर्षी कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
उप्रक्रमास अमोल हरिभाऊ जावळे यांचे सहकार्य लाभत आहे.या उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख तेजेंद्र महाजन (9511213830), प्रकल्प समन्वयक शैलेन्द्र महाजन (9423476837) सहसमन्वयक मंगेश भावे (9595848043) यांनी रोपांसाठी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.उपक्रमासाठी ज्ञानेश्वर घुले, संजय भटकर, ग.स.संचालक योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, जीवन महाजन, अमित चौधरी, अमितकुमार पाटील, प्रसन्ना बोरोले, समाधान जाधव, राजू वारके, देव सरकटे, भूषण झोपे, विक्रांत चौधरी, प्रा.श्याम दुसाने, निवृत्ती पाटील, सचिन पाटील, कुंदन वायकोळे,जीवन सपकाळे, प्रमोद पाटील, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील परिश्रम घेत आहेत.