<
तंत्रज्ञान
भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत रियलमी, रेडमी, टेक्नो ह्या स्मार्टफोन कंपन्यांना टक्कर देण्यासाठी इंफिनिक्स या स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने त्यांच्या बजेट स्मार्टफोन रेंजमध्ये नुकताच ‘इंफिनिक्स स्मार्ट 6 प्लस’ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे मुख्य फीचर्स
◆ डिस्प्ले :- ६.८२ इंच एचडी प्लस डिस्प्ले असलेल्या या स्मार्टफोनला वॉटरड्रॉप नॉच देण्यात आला असून, या डिस्प्लेची ब्राईटनेस ४४० निट्स आहे.
◆ कॅमेरा :- इंफिनिक्स स्मार्ट 6 प्लस स्मार्टफोनला फोटोग्राफीसाठी ८ मेगापिक्सल + डेप्थ सेंसर असलेला रियर कॅमेरा असण्याबरोबरच ड्युअल एलईडी फ्लॅश असलेला ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
◆ प्रोसेसर :- मल्टीटास्किंग व प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हिलिओ जी२५ हा शक्तिशाली प्रोसेसरची जोड देण्यात आली आहे.
◆ रॅम व स्टोरेज :- ६४जीबी इंटर्नल स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनमध्ये ५१२जीबी पर्यंतचे मेमरी कार्ड टाकता येते तसेच यास ३जीबी रॅम आहे, जी ६जीबीपर्यंत वाढवता येईल.
◆ अन्य विशेष फीचर्स :- अँड्रॉइड १२ व्हर्जन असलेल्या या स्मार्टफोनमध्ये सिक्युरिटीसाठी फेस अनलॉक तसेच रियर फिंगरप्रिंट सेंसर सहित उच्च क्षमतेची ५,०००एमएएच बॅटरी दिली आहे.
कधी व कुठे मिळेल हा स्मार्टफोन?
येत्या ३ ऑगस्ट रोजी हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.