<
तंत्रज्ञान
स्मार्टफोन एसेसरीज निर्माता (पीट्रॉन) PTron ह्या कंपनीने त्यांच्या टॅजेंट या बलुटूथ नेकबँड सिरीज मध्ये ‘पीट्रॉन टॅजेंट डुओ’ हा स्वस्तात मस्त आणि दमदार फीचर्सनी परिपूर्ण असा वायरलेस इयरफोन लाँच केला आहे. चला तर मग जाणून घेऊया पीट्रॉन टॅजेंट डुओ बाबत….
◆ पीट्रॉन टॅजेंट डुओ हा मैग्नेटिक वायरलेस इयरफोन फेव ब्लॅक, मॅजिक ब्लू, ग्रे आणि ओशन ग्रीन ह्या रंगात उपलब्ध आहे, आपण हा नेकबँड अमेजॉन येथून ₹४९९ ना खरेदी करू शकता.
◆ पीट्रॉन ब्रँडचे हे लेटेस्ट नेकबँड इयरफोन १३एमएम ड्रायव्हर्ससह लॉन्च करण्यात आले असून, कंपनीने या डिव्हाइसमध्ये अतिरिक्त बाससाठी एएसी कोडेक वापरला असल्याने, आपल्याला उत्कृष्ट असा साउंड आउटपुट मिळेल.
◆ हा नेकबँड इयरफोन आयपीएक्स४ प्रमाणित असल्याने घाम व वॉटर रेजिस्टंट आहे तसेच म्युजिक कंट्रोल करण्यासाठी मल्टी फंक्शन बटन्स दिले आहेत, ज्याच्या मदतीने गूगल असिस्टेंट, सिरी, अमेजॉन अलेक्सा हे फीचर्सदेखील कंट्रोल करता येतात.
◆ कॉल्स व म्यूजिक मॅनेज करण्याकरिता यात इन लाईन मायक्रोफोन्स दिले आहेत व हे इयरफोन ड्यूल पेयरिंगही सपोर्ट करतात.
◆ बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाल्यास यात २००एमएएच क्षमतेची बॅटरी आहे तसेच चार्जिंगसाठी यात टाइप सी पोर्ट दिलेला असल्याने हा नेकबँड अवघ्या १० मिनिटासाठी चार्ज केल्यास ३ तास तर फुल चार्ज केल्यास २४ तास चालेल, असा दावा कंपनीने केला आहे.
त्यामुळे संगीतप्रेमी व्यक्तींसाठी निश्चितच हे एक किफायतशीर इयरफोन ठरतील.