<
जळगाव-जिमाका-जळगाव जिल्ह्यातील सैनिकी शाळा, सातारा येथे प्रवेशपात्र परिक्षेसाठी अर्ज करू इच्छूणाऱ्या विद्यार्थ्यांनी Sainikschooladmission.in किंवा www.sainiksatara.org या वेबसाईटवर दिनांक 23 सप्टेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेशपात्र परिक्षेसाठीचा अर्ज भरावा.
प्रवेशपात्र परिक्षेसाठी पात्रता, निकष, निवड पध्दती व उपलब्ध जागा अशा आहेत.
इयत्ता ६ वीसाठी प्रवेश घेवू इच्छिणारा विद्यार्थी १ एप्रिल २००८ ते ३१ मार्च २०१० दरम्यान जन्मलेला असावा, त्याची लेखी परिक्षा आणि वैद्यकीय चाचणी परिक्षा घेण्यात येईल, उपलब्ध जागा एकूण ६० एवढ्या आहेत. तर इयत्ता ९ वीत प्रवेशपात्र परिक्षेसाठी अर्ज भरणारा विद्यार्थी हा १ एप्रिल २००५ ते ३१ मार्च २००७ दरम्यान जन्मलेला असावा, त्याला प्रवेश फक्त गुणवत्तेवरच दिला जाईल.
प्रवेशपात्र परिक्षेसाठी शुल्क खुल्या वर्गासाठी ४०० तर मागासवर्गीय वर्गासाठी २५० रुपये एवढे आहे. प्रवेश इयत्ता ६ वीसाठी प्रवेश परिक्षा केंद्र अहमदनगर, बीड, जळगाव, कोल्हापूर, लातूर, महाड, मुंबई, नाशिक, पुणे, सातारा आणि सोलापूर असे असून इयत्ता ९ वीसाठी सातारा हे एकमेव केंद्र असल्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जळगाव योगेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.