<
जळगाव – (प्रतिनिधी) – मुलांचे प्रचंड शेक्षणिक नुकसान भरून यावे या प्रांजळ हेतूने सर्व जातीधर्माच्या मुलांसाठी मोफत शिकवणी वर्ग शिंदीला सुरू आहे. तेथेच शिंदी ता. भुसावळ येथील देवराम हरी सपकाळे ( मिस्तरी) यांचा १२वा स्मृतीदिन २९ जुलै २०२२ रोजी सपकाळे परिवारातर्फे साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी मुलांना खाऊ, आणि राजर्षी शाहू महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीमाई फुले, महात्मा फुले, माता रमाई आंबेडकर, अण्णाभाऊ साठे या महापुरुषांची पुस्तके वाटप तसेच भोजनदान करण्यात आले.
सोपान बळीराम सपकाळे, भिमराव श्रीधर तायडे यांनी फोटोला पुष्पहार अर्पण केले. सिद्धार्थ भिमराव तायडे यांनी पुष्प वाहिले.
अत्यंत गरीब, विधवा महिलांना नऊवारी पातळ मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. सुषमा सुपडू भालेराव मॅडम (जळगाव) यांनी ग्रामीण मुलांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेक्षणिक विचार यावर मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना उत्तमप्रकारे लेझिम शिकविले. सखूबाई दिलीप जाधव, विजया सोपान सपकाळे यांनी खाऊ वाटप केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिद्धार्थ भिमराव तायडे आणि त्यांचे सर्व सहकारी व महिला यांचे मोलाचे सहकार्य लाभले.