<
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेतर्फे पत्रकार बांधवांना रेनकोट व छत्री चे वाटप
पाचोरा-(प्रतिनिधी) – पाचोरा भडगांव पारोळा व चाळिसगांव या तालुक्यातील म.रा.मराठी पत्रकार संघटनेच्या पत्रकारांना रेनकोट = छत्री वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्र झाला.
संघटनेने आत्तापर्यन्त केलेले कार्य हे समाजाभिमुख असुन या संघटनेच्या सर्व पदाधिकार्यांचे कौतूक करावे तेवढे थोडे आहे असे गौरवोद्गार पाचोरा प्रांतधिकारी डाँ विक्रम बांदल यांनी काढले.
दि. २९ जुलै रोजी शक्तीधाम सांप्रदाईक सभा मंडप येथे जिल्ह्यातील ३००पत्रकारांच्या उपस्तितीत मान्यवरांच्या हस्ते पत्रकार बांधवासाठी रेनकोट व छत्री वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला सुरूवातीला इन्दोर अमळनेर बस अपघातातील मृत पापलेल्या प्रवाश्यांना श्रध्दांजली देण्यात आली दिपप्रज्वलन करून पत्रकारांचे आद्यगुरू बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म.रा.मराठी पत्रकार संघटनेचे राज्य सरचिटणीस विश्र्वासराव आरोटे ,पाचोरा प्रांतधिकारी डाँ विक्रम बांदल पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी भरत काकडे पाचोरा , तहसिलदार कैलास चावडे , भडगांव तहसिलदार मुकेश हिवाळे भडगांव पो. निरिक्षक अशोक उतेकर , विभागीय अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे , खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा , जेष्ट पत्रकार किसनराव जोर्वेकर , भडगांव नगरसेविका योजना पाटील , यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला या वेळी अध्यक्षीय भाषणात संघटनेच्या वाटचाली बाबत तळागडातील पत्रकार बांधवासाठी संघटना सदैव पाठीशी उभी राहत असुन दिवसेन दिवस या संघटनेत असंघटीत पत्रकारांची संघटीत पत्रकार म्हणुन म.रा. मराठी पत्रकार प्रवाहात येत आहेत आज पर्यन्त संघटनेच्या चाळिस हजार क्रियाशिल सभासदांची नोदणी झालेली असुन ही राज्याची एकमेंव संघटना आहे हिचा विस्तार गोवा, गुजरात , मध्यप्रदेश, व भारताची राजधानी असलेल्या दिल्ली या ठिकाणी विस्तारीत आहे असे आपल्या मनोगतात विश्वासराव आरोटे यांनी सांगीतले.
या वेळी डाँ विक्रम बांदल , भरत काकडे , कैलास चावडे , प्रविण सपकाळे , किसनराव जोर्वेकर , अशोक उतेकर , नगराज पाटील , यानी संघटनेच्या कार्या बद्दल गौरौउदगार काढले.
कार्यक्रमाला नितीन पाटील , संदीप महाजन , प्रविण ब्राम्हणे ,प्रा अमोल झेरवार,महेश कोण्डिणे , संदीप केदार , योगेश पाटील ,पाचोरा ता. अध्यक्ष शांताराम चौधरी भडगांव ता. अध्यक्ष गणेश रावळ, चाळिसगांव ता.अध्यक्ष महेन्द्र सुर्यवंशी, पारोळा ता. अध्यक्ष बाळु पाटील , अनिल येवले , अशोक भावसार , भिकन पाटील, राकेश सुतार , दिलिप जैन , राहुल महाजन, विनोद कोळी , अबरार मिर्झा, चेतन महाजन , मिलिद लोखंडे , प्रविण बोरसे , सुनिल कोळी, आदी पत्रकार बाधंव मोठ्या संख्येने उपस्तित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना किशोर रायसाकडा यांनी केली तर सुत्र संचालन प्रा सि. एन. चौधरी व शाताराम चौधरी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीते साठी प्रमोद सोनवणे, नगराज पाटील , भुवनेश दुसाने, यांनी प्रयत्न केले.
या कार्यक्रमाला विषेश उपस्थीती कुंडली विषारद गजानन मगल जोशी यांची लाभली.