<
जळगाव -(प्रतिनिधी) – मुंबई महाराष्ट्र व देशाची आर्थिक राजधानी आहे . तरीदेखील “मुंबईतुन राजस्थानी व गुजराथि लोक जर बाहेर पडले तर मुंबई हि आर्थिक राजधानी राहणार नाहि ” असे वादग्रस्त व बेताल वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी एका कार्यक्रमात जाहीरपणे केले .
या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे मन दुखावले आहे व महाराष्ट्राचा व महाराष्ट्रीयन नागरिकांचा अपमान झालेला आहे . यापूर्वी देखील कोशारिंनी महात्मा फुले , छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांविषयी व ईतरही बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात अशांतता निर्माण झाली होती . राज्यपाल या अत्यंत जबाबदारीच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने सातत्याने असे वादग्रस्त समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणे अत्यंत निंदनीय व खेदजनक आहे.
या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि जळगाव जिल्हा महानगर तर्फे आकाशवाणी चौक येथे महामार्गावर रस्ता अडवून राज्यपालांविरोधात घोषणाबाजी करत तिव्र निषेध आंदोलन करण्यात आले . तसेच महाराष्ट्रात नविन राज्यपालांची नियुक्ती करण्यात यावी अशी जाहिर मागणी करण्यात आली .
सदर आंदोलनात महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , सुनील माळी , राजू मोरे , रिकू चौधरी , अमोल कोल्हे , सुशील शिंदे , अशोक सोनवणे , उज्वल पाटिल , भगवान सोनवणे , रमेश बहारे , दत्तात्रय सोनवणे , रहीम तडवी , विशाल देशमुख , इब्राहिम तडवी सर , किरण राजपूत , अनिल पवार , संजय जाधव , राहुल टोके , किरण चव्हाण , सूर्यकांत भामरे , हितेश जावळे , भला तडवी , भिमराव सोनवणे व कार्यकर्ते उपस्थित होते .