<
रोजगार
आजकाल आपल्यातील प्रत्येकाला स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते. बहुतांश लोक हे घरबसल्या ऑनलाइन व्यवसाय अथवा कामाच्या शोधात असतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला अशा ऑनलाइन व्यवसाय व कामांबाबत माहिती देणार आहोत, ज्यामुळे आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळेल
◆ ऑनलाइन वित्तीय सेवा व उत्पादने पुरवणे:- आजकाल सर्वकाही ऑनलाइन झाल्यामुळे बँकेची खाती उघडणे, डिमॅट अकाउंट उघडणे व क्रेडिट कार्डास अर्ज करून देणे इत्यादी कामांचे प्रमाण वाढले आहे. आपणही हे काम करून पैसे कमावू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये BankSathi, Gromo, RocketSingh व Onecode ह्या एप्स डाउनलोड करून यावर स्वतःचे अकाउंट बनवावे लागेल. त्यानंतर आपण एपद्वारेच कामाची माहिती व प्रशिक्षण घेऊन पैसे कमवू शकता.
◆ ऑनलाइन रिसेलिंग:- या व्यवसायात तुम्हाला विविध उत्पादनांची ऑनलाइन रिसेलिंग म्हणजे पुनर्विक्री करायची असते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये Shopsy नावाचे एप डाउनलोड करून त्यावर अकाउंट बनवावे लागेल. यातही आपल्याला कामाची माहिती व प्रशिक्षण मिळेल.
◆ एफिलेट मार्केटिंग:- एफिलेट मार्केटिंग म्हणजे विक्री उत्पादनांच्या ऑनलाइन लिंक्स सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांसोबत शेअर करून, उत्पादनांची विक्री करणे होय. यासाठी प्रत्येक उत्पादनाच्या विक्रीवर आपल्याला कमिशन मिळेल. हे काम सुरू करण्यासाठी आपण ExtraPe हे एप डाउनलोड करून अधिक माहिती घेऊ शकता.