<
आरोग्य
आजच्या धकाधकीच्या जीवनात व बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या शारीरिक, बौद्धिक व मानसिक शक्तीवर विपरीत परिणाम होतो. परिणामी यामुळेच आपली एकाग्रता व समरणशक्ती कमकुवत होते. यावर उपाय म्हणून आपण नियमितपणे योगासने व सूर्यनमस्कार यासारखे व्यायाम केले पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत एकाग्रता व समरणशक्ती वाढविणारी योगासने….
◆ पद्मासन – पद्मासनाला इंग्रजीत ‘लोटस पोज’ असेही म्हटले जाते. पद्मासनासाठी पायांची अढी करून बसावे लागते. या आसनामुळे मन शांत होण्यास मदत होते तसेच एकाग्रताही वाढते. आपण हे आसन नियमितपणे करू शकता.
◆ वज्रासन – वज्रासन करण्यासाठी आपण सर्वप्रथम गुडघे टेकून बसा आणि पाठीचा कणा सरळ ठेवून हळूहळू श्वसन करा. मन शांत ठेवण्यासाठी वज्रासन मदत करते तसेच यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढते व ताणतणाव नाहीसा होतो.
◆ सर्वांगासन – हे आसन करण्याकरिता आपण हाताचे पंजे जमिनीवर दाबून, हात आणि पाय ताणून पाय उत्तानपादासनाप्रमाणे जमिनीपासून वर उचलून तसेच धरा पायाचे पंजे आकाशाच्या दिशेने ठेवा. श्वास सोडा आणि पाय डोक्याकडे असे आणा की, पुठ्ठे आणि कमरेचा भाग थोडा वर उचललेला असेल, अशा पद्धतीने हे आसन केल्यास लाभ होईल.
◆ पश्चिमोत्तानासन – दोन्ही पाय जमिनीवर सरळ पसरून बसा. दोन पायांमध्ये अंतर नसावे आणि पाय शक्य तितके सरळ ठेवावे. यासोबतच मान, डोके आणि पाठीचा कणा सरळ ठेवल्यानंतर आपल्या हाताचे दोन्ही तळवे गुडघ्यांवर ठेवा. पश्चिमोत्तानासन केल्याने डोकेदुखीसारख्या व्याधी दूर होतात
★ टीप:- वरील लेख हा केवळ माहितीसाठी असून, यातील उपाय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावे.