<
जळगाव – (प्रतिनिधी) – बहुजन जागृती मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जळगांव शहरातील बौद्ध समाजातील इयत्ता १० वी व १२ वी मध्ये विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा संस्थेचे अध्यक्ष दिपक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पबचत भवन जळगाव येथे शनिवार दिनांक ३०/०७/२०२२ रोजी संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून वंदन करण्यात आले व त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले . सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे होते . कार्यक्रमाचे उदघाटन जळगाव शहराचे आमदार मा. सुरेश ( राजुमामा ) भोळे यांच्या हस्ते करण्यात आले . प्रमुख अतिथी म्हणुन जळगावचे माजी महापौर सदाशिवराव ढेकळे , जामनेरचे नगरसेवक भगवान सोनवणे , नगरसेवक गणेश सोनवणे , नगरसेवक चेतन सनकत , आर. पि. आय . चे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महानगर उपाध्यक्ष अमोल कोल्हे , साहित्यिक वसंततात्या सपकाळे , भाजपा ओबीसी सेल महानगर अध्यक्ष जयेश भावसार , धीरज सोनवणे ( मुंबई ) , सागर नन्नवरे , मिलिंद सोनवणे , डी एम अडकमोल , राजू मोरे , यशवंत घोडेस्वार , आनंदा तायडे , गौतम सपकाळे आदि उपस्थित होते . सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष दिपक सपकाळे तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जे. डी. भालेराव यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक पारधे , भीमराव सोनवणे , आनंदा सोनवणे , गौतम सोनवणे , दिपक बिऱ्हाडे , राजू सपकाळे ( पिंप्राळा ), राजू सपकाळे ( सिद्धार्थ नगर ) , प्रविण परदेशी , सिद्धार्थ गव्हाणे , बेबाबाई सपकाळे , आशाबाई अन्नावर , ऊषाबाई सपकाळे , लिलाबाई खिल्लारे , कलाबाई पारधे , रुपाली भालेराव आदींनी परिश्रम घेतले .