<
जळगाव – (प्रतिनिधी) – जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव आणि स्टेट बँक ऑफ इंडिया जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उमेद अभियानातील स्वयंसहायता समूहातील महिलांना कर्ज वितरणाचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता.
त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद जळगाव अंतर्गत महिला स्वयंसहायता समूह आणि तयार केलेल्या उत्पादनांचे स्टॉल लावण्यात आले होते सदर कार्यक्रमांमध्ये माननीय श्री अभिजीत राऊत साहेब जिल्हाधिकारी जळगाव , माननीय श्री डॉक्टर पंकज आशिया साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव , माननीय श्रीमती मेरी सगया धनपाल महाव्यवस्थापक भारतीय स्टेट बँक नेटवर्क महाराष्ट्र मंडल , माननीय श्री राजीव सौरव उपमहाव्यवस्थापक भारतीय स्टेट बँक , माननीय श्री किशोर राणे साहेब जिल्हा अभियान व्यवस्थापक उमेद जळगाव , माननीय श्री चंद्रकांत सोनवणे जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन , माननीय श्री अनिल बडगुजर जिल्हा व्यवस्थापक IBCB , माननीय श्री हरेश्वर भोई जिल्हा व्यवस्थापक मार्केटिंग आणि विपणन , माननीय श्री राहुल ठोसरे जिल्हा व्यवस्थापक उपजीविका आणि कृतीसंगम , माननीय श्री समाधान पाटील डी आर पी जळगाव , माननीय श्री रवींद्र सूर्यवंशी तालुका अभियान व्यवस्थापक जळगाव या सर्व मान्यवरांनी महिला स्वयंसहायता समूहातील स्टॉल ला भेट दिली आणि वस्तूंची खरेदी केली.
सर्व मान्यवरांनी महिलांनी बनविलेल्या सर्व प्रॉडक्टचे कौतुक केले सदर स्टॉल साठी माननीय श्रीमती हेमांगी टोकेकर नशिराबाद भादली बुद्रुक जिल्हा परिषद प्रभागातील प्रभाग समन्वयक आणि माननीय श्रीमती हर्षा इंगळे शिरसोली चिंचोली जिल्हा परिषद प्रभागातील प्रभाग समन्वयक यांनी स्वयंसहायता समूहातील महिलांना स्टॉल साठी अनमोल असे मार्गदर्शन केले. सदर स्टॉल मध्ये श्रीमती वैशाली तारकस , श्रीमती वनिता वाणी , श्रीमती मनीषा नाथ , श्रीमती सुनिता शिवरामे , श्रीमती उज्वला पाटील , श्रीमती प्रमिला सपकाळे , श्रीमती मनीषा कोळी , श्रीमती छाया भोळे , श्रीमती सुरेखा कावळे यांनी बनविलेल्या हँडमेड वस्तू सदर स्टॉल ला विक्री करण्यात आले.
सदर मुक्ताई ब्रँड च्या कॅनोपिज आणि स्टॉल साठी माननीय श्री स्वप्नील सोनार , माननीय श्री हर्षल दुसाने , माननीय श्री सचिन पांढरकर , माननीय श्री प्रदिप बारेला यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच सदर स्टॉलला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आणि सर्व प्रॉडक्टचे भरघोस प्रमाणात विक्री झाली. तसेच 151 महिला स्वयं सहायता समूहांना 3 कोटी 25 लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. तसेच सदर कार्यक्रमांमध्ये श्रीमती वैशाली तारकस आणि श्रीमती सुनिता शिवरामे यांनी स्वागत गीत सादर केले. तसेच श्रीमती रूपाली कोळी यांनी त्यांच्या स्वतःचा मसाल्याच्या उद्योगा संबंधी सक्सेस स्टोरी सादर केली. सर्व महिलांचे माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी प्रशंसा केली.