<
जळगाव – (प्रतिनिधी) – दि ०१ ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाने केलेल्या आव्हानास प्रतिसाद देत कार्यक्रमाचे आयोजन शकुंतला जे प्राथमिक विद्यालयात करण्यात आले.
आयोजनात शिक्षणशास्त्र विद्यालय जळगाव येथील आंतरवासीता उपक्रमातील विद्यार्थ्यानी आयोजनात सहभाग घेतला. अमृत महोत्सवानिमित्ताने भारत माता प्रतिमा पूजन सेवानिवृत्त सैनिक श्री रवींद्र पांडुरंग फालक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या सेवानिवृत्त शिक्षिका पत्नी सौ कुंदा फालक , आंतरवासीता गटप्रमुख श्री संजय नन्नवरे व पालक शिक्षक उपाध्यक्षा राजश्री वाणी या प्रसंगी उपस्थित होते . लोकमान्य टिळक पुण्यतिथि व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमाचे पूजन याप्रसंगी करण्यात आले. माजी सैनिक व त्यांचा सेवानिवृत्त शिक्षिका पत्नी यांचा सत्कार करण्याचा योग या ठिकाणी जुळून आला .
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रविंद्र फालक यांनी स्वातंत्र सैनिक यांच्या कार्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. सैनिक सीमेवर लढून आपल्या देशासाठी बलिदान देत असतो. सैनिकांचा त्याग व कार्याची महती विद्यार्थ्यांना सांगितली . आंतरवासिता प्रमुख प्राध्यापक संजय नन्नवरे यांनी विद्यार्थ्याना अमृतमहोत्सव विषयी मार्गदर्शन केले व लोकमान्य टिळक , अण्णाभाऊ साठे यांचे कार्याचे माहिती विद्यार्थ्यांना दिली. सौ कुंदा फालक यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा परिचय करून दिला . व शाळांमध्ये राबविल्या जाणा-या अमृत महोत्सव कार्यक्रमाचे कौतुक केले . विद्यार्थ्यानी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त जयदीप सोनार , जान्हवी नाथबाबा , फैजल पिंजारी , खुशी राठोड , यांनी भाषणे सादर केली . भाषणात सहभागी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली . प्रीती भोई ही विद्यार्थिनीने भारत माता व हितेश भोई या विद्यार्थ्याने सैनिकांची वेशभूशा धारण केली होती. परिसरात प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. भारत माता की जय , वंदे मातरम जयघोष करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका हर्षदा सपकाळे व छात्राध्यापक राज ठाकरे यांनी संयुक्तपणे केले.
कार्यक्रमात छात्राध्यापिका सोनाली साठे, प्रेरणा साळुंखे यांनी देशभक्ती गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन हिना तडवी यांनी केले. छात्राध्यापिका सोनाली साठे , शुभागी वाणे यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रम प्रसंगी स्वाती जंगले , लक्ष्मी भालेराव , जयश्री झांबरे , सुरेखा मिस्तरी , वैभव पाटील,राज ठाकरे, शाम चिमणकर , व सर्व छात्राध्यापक व छात्रध्यापिका उपस्थित होते .