<
नेरी – (प्रतिनिधी) – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जळगाव तर्फे समाजसुधारक, साहित्यकार, कवी, प्रबोधनकार, कामगारांच्या व्यथा मांडणारे, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रणी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
बार्टी तर्फे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा नेरी ता: जामनेर येथे वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले व कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख वक्ते श्री.मुकेशजी सावकारे सर (आधारस्तंभ फाॅऊंडेशन, जळगाव), कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.युनुस तडवी (प्रकल्प अधिकारी, श्री.अभिजित किरोते सर, कार्यक्रमाचे उद्घाटक श्री.आर.ए.पाटील सर (मुख्याध्यापक, जनता माध्य व उच्च माध्य. विद्यालय) प्रमुख उपस्थिती श्री.एस.एन.पाटील सर (पर्यवेक्षक, जनता माध्य व उच्च माध्य. विद्यालय) कार्यक्रम आयोजक समतादूत श्रीमती. अर्चना किरोते यांचा विद्यालयाच्या वतीने स्वागत-सत्कार करण्यात आला तदनंतर मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांसमोर खुल्या गटातून वकृत्व स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या वकृत्व शैलीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जिवन कार्यावर, साहित्यावर, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, आणि कामगार चळवळीवर प्रकाश टाकत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित खुप छान वक्तृत्वाने खऱ्या अर्थाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांचे समाजकार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे काम केले.
त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडतांना श्री.युनुस तडवी (प्रकल्प अधिकारी, बार्टी) यांनी बार्टी व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त प्रबोधन सप्ताह साजरा होत आहे ०१ आॅगस्ट ते १० ऑगस्ट दरम्यान विविध स्पर्धा आणि प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सहभागी विद्यार्थ्यांना बार्टी तर्फे प्रमाणपत्र मिळणार असून संपूर्ण महाराष्ट्राभर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती दिली.
तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख वक्ते श्री.मुकेशजी सावकारे सर (आधारस्तंभ फाॅऊंडेशन, जळगाव) यांनी आपल्या विशिष्ट शैलीत विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जिवकार्याबद्दल जाणीव करून देत, अण्णा भाऊ साठे यांच्या शिक्षणाबद्दल, साहित्याबद्दल आणि संयुक्त महाराष्ट्र तसेच कामगार चळवळीचे नेतृत्व अण्णाभाऊ साठे यांनी करून संपुर्ण जिवन कशापद्धतीने कष्टकरी, शेतकरी आणि कामगार यांच्या उद्धारासाठी व हक्कासाठी व्यतित केले याचे सविस्तर वर्णन केले तसेच फकिरा, माझी मैना गावावर, विविध शिवचरित्र पोवाडे यांची माहिती देत दिड दिवस शिक्षण घेणारे अण्णाभाऊ मोठे साहित्यिक होतात याची जाणीव विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनात करून दिली. यानंतर समतादूत श्रीमती. अर्चना किरोते मॅडम यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जिवनकार्यावर प्रबोधन करित मनोगत व्यक्त केले शेवटी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.ए.पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. तेजश्री पाटील मॅडम व श्री.बी.एन.जाधव सर यांनी केले.
कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षकवर्ग श्री.आर.व्ही.पाटील सर, श्री.एस.पी.खोडपे सर, श्री.एस.डी.सुरडकर सर, श्री. एस.बी.सोनवणे सर, श्री.एन.बी.पाटील सर, श्री.एस.एस.सोनवणे मॅडम तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.