<
उठा,नेतृत्व करा! आणि होय, मी महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास तयार आणि सक्षम आहे- मासु संस्थापक अध्यक्ष – ॲड.सिद्धार्थ सोनाजी इंगळे
मुंबई – (विशेष प्रतिनिधी) – येथील पनवेल या ठिकाणी असलेल्या जीवन विद्या ज्ञानसाधना केंद्राच्या सभागृहात ही बैठक नुकतीच पार पडली आहे, यावेळी संघटनेचे पदाधिकारी महाराष्ट्र भरातुन उपस्थित होते.
महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन अर्थात मासु ही तळागळातील गरीब, दिनदुबळ्या, कष्टकरी, कामगार, शेतकरी, आदिवासी आणि मागासवर्गीय वर्गातील जनसामान्य विद्यार्थ्यांच्या न्याय, हक्क आणि अधिकारांच्या पूर्ततेसाठी बंड पुकारुन संघर्ष करणारी “विद्यार्थी संघटना” असून दिनांक ३१जुलै, २०२२ रोजी मासूच्या संस्थापकीय बोर्डाच्या वतीने कोंकण व मुंबई प्रदेश कमिटीचा विस्तार करण्यात आला, सोबतच महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारींसोबत पनवेल येथील जीवन विद्या ज्ञानसाधना केंद्राच्या सभागृहात महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे संस्थापक अधक्ष ॲड.सिद्धार्थ सोनाजी इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची बैठक देखील आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
बैठकीमध्ये कोंकण व मुंबई प्रदेश कमिटीचा विस्तार करण्यात आलेला असून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे.
कोंकण प्रदेश कमिटी
ॲड.गौरव शेलार- अध्यक्ष
श्रीमती. रसिका सारंग – उपाध्यक्ष
सिंधुदुर्ग जिल्हा कमिटी
ॲड.- सिद्धेश माणगावकर – निरीक्षक
श्रीमती- प्रणिता कोटकर – अध्यक्ष
ॲड.भालचंद्र कुलकर्णी-उपाध्यक्ष
श्री. जयदीप बल्लाळ- उपाध्यक्ष
श्री. आदित्यकुमार पाटकर – सदस्य
श्री. हार्दिक कदम – सदस्य
मुंबई प्रदेश कमिटी- तालुका कमिटी
ॲड.असीरूल शेख -अध्यक्ष,अंधेरी तालुका
श्री. वासिम सय्यद – अध्यक्ष – कुर्ला तालुका
श्री. शैबाज खान – उपाध्यक्ष – कुर्ला तालुका
कल्याण डोंबिवली तालुका
श्री. प्रदीप म्हस्के – अध्यक्ष
श्री.तुषार शिंदे – न्यू हायस्कुल महाविद्यालय, कल्याण
औरंगाबाद जिल्हा
श्री. प्रफूल राणभर – अध्यक्ष.
यावेळी महाराष्ट्राच्या मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कर्जत,नांदेड, धुळे, औरंगाबाद , नाशिक, अहमदनगर सह मासुचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
महापुरुषांना अभिवादन करून, संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले.
सोबतच संघटनेच्यावतीने आज जाहीरनामा देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. विद्यार्थी हितासाठी लढणाऱ्या विद्यार्थी संघटनेचा जाहीरनामा प्रसिद्ध व्हावा ही महाराष्ट्रातील पहिलीच ऐतिहासिक वेळ होती अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
संघटनेसाठी प्रामाणिक कार्य घडावे यासाठी सामूहिक शपथ देखील सर्वांनी घेतली. महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन कशी स्थापन झाली, त्यांची धेय्य धोरण काय आहेत याबाबतीत मासुचे कार्याध्यक्ष ॲड.सुनिल देवरे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात नवनियुक्त पदाधिकारींना संबोधित केले, आपली संघटना संविधनिक मार्गानेच संघर्ष करणार असे संघटनेचे उपाध्यक्ष ॲड.प्रशांत जाधव यांनी सांगितले.
मान्यवरांच्या संबोधनांतर संस्थापक अध्यक्ष ॲड.सिद्धार्थ इंगळे यांनी सर्व पदाधिकारींना पुढची वाटचाल कशी करायची आहे, कोणते विषय हाती घेऊन आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहचायचे आहे यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आणि “संघटनेच्या कामाला लागा, शिक्षणातील खाजगीकरण,बाजारीकरण आणि भांडवलीकरण असलेली शिक्षण व्यवस्था आपल्याला उखडून फेकायची आहे” अशी सूचना केली प्रसंगी मासुच्या जाहिरानामा प्रसिद्ध करतेवेळी अध्यक्षानी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील तरुणांना उठा,नेतृत्व करा! आणि होय, मी महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास तयार आणि सक्षम आहे असा संदेश आपल्या अध्यक्षीय भाषणात दिला.तसेच मासु पदवीधर सिनेट, पदवीधर व शिक्षक मतदार संघ आणि विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थी संघटनेच्या निवडणूक लढ्याण्यास तयार आहे असे सूचक वक्तव्य अध्यक्षानी पदाधिकारी यांना देऊन तयारीला लागा अश्या सूचनादेखील दिल्या.
याप्रसंगी ॲड. नागेश पवार, ॲड. सुनिल तोतावड, ॲड. क्रांती अभंगे, डॉ. वसंत राठोड, श्री. परेश चौधरी मान्यवर म्हणून उपस्थित होते तसेच मासुचे नांदेड, धुळे, औरंगाबाद, जळगाव,जिल्हा अध्यक्ष श्री, वाजीद शेख, आकाश वळवी,अतुल उबाळे,ॲड. स्नेहल निकाळे, माधुरी कदम उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुनिल जाधव यांनी केले व शेवटी राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली.