<
भडगाव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचलनालयातर्फे आयोजित १९ वर्षाआतील शासकीय जिल्हास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे नुकत्याच पार पडल्या,या स्पर्धेत १९ वर्षाआतील मुलींच्या गटात क.ता.ह.रा.पा. कि.शि.सं.भडगाव, संचलीत गो.पु.पाटील,कनिष्ठ महाविद्यालय कोळगाव ता.भडगाव येथील मुलींच्या संघाने आपल्या प्रतिष्ठेला तडा न जाऊ देता आपल्या गटातील कबड्डी सामन्यांमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत अंतिम फेरीपर्यंत मजल मारत उपविजेतेपद पटकावले.
कबड्डीतील उपविजयी संघात रुपाली पाटील,प्रियंका पाटील, ललीता कोळी,अपर्णा मराठे,निकीता परदेशी,सपना मोरे,मनीषा करंकाळ,फरहाना कौसर आदिंनी उत्कृष्ट खेळ केला.
उपविजयी मुलींच्या संघास सौ.सोनाली सोनवणे व्यवस्थापक म्हणून तर क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे तसेच राष्ट्रीय खो-खो पंच प्रेमचंद चौधरी हे मार्गदर्शक म्हणून लाभले.
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील उपविजयी संघाचे संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामकांत भोसले,दुध फेडरेशनच्या संचालिका पुनमताई पाटील, मंत्रालयातील अव्वर सचिव प्रशांत पाटील,माध्यमिक पतपेढीचे संचालक जगदीश पाटील,डॉ.कमलेश भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.पाटील,पर्यवेक्षक टी.एस.पाटील, अनिल पवार,क्रीडा शिक्षक आर.एस.कुंभार , आर.ए.पाटील,किशोर चौधरी,मनोज पवार,चेतन भोसले तसेच प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.