<
सिने जगत
हिंदी सिनेसृष्टीचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांनी जितके यश कमावले, तितके यश आजवर कोणी कमावलेले नाही, कारण त्यांनी केवळ हिंदी सिनेसृष्टीतच नव्हे तर चाहत्यांच्या, रसिकप्रेक्षकांच्या मनावरही अधिराज्य गाजवले. आता त्यांची नातही लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे बोलले जात आहे.
राजेश खन्ना यांच्या दोन्ही मुली ट्विंकल व रिंकी यांनीही अनेक सिनेमांमध्ये काम केले. आता त्यांची नात नाओमिका हीदेखील बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा सुरू असून, ती सध्या लंडनमध्ये तिचे शिक्षण पूर्ण करत आहे.
नाओमिका ही अभिनेत्री ट्विंकल खन्नाची भाची व अभिनेत्री रिंकी खन्ना व व्यावसायिक समीर सरन यांची मुलगी आहे. रिंकी हिने २००३ साली व्यावसायिक समीर सरनसोबत लग्न केले.
राजेश खन्ना यांची मोठी मुलगी रिंकी हिची सिनेकारकीर्द लहान असली तरी तिने ‘प्यार में कभी कभी’, ‘मुझे कुछ कहना है’, ‘जिस देश में गंगा रहता है’ इत्यादी चित्रपटांमध्ये काम केले आहे.