<
मुंबई – (प्रतिनिधी)
एकीकडे जनता महागाईच्या झळा सोसत आहे, तर दुसरीकडे त्यांच्या खिशावरील भार वाढल्याने घराचे महिन्याचे अंदाजपत्रकही बिघडत आहे. अशातच बिस्कीट, ब्रेड आणि केक यांच्याही किमती वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील सर्वात जुनी व दिग्गज बिस्कीट निर्माता कंपनी ‘ब्रिटानिया’ ही त्यांच्या बिस्कीट, ब्रेड आणि केक यासारख्या उत्पादनांच्या किंमतींमध्ये ७% वाढ करणार असल्याचे वृत्त असून, ही दरवाढ रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतीय उद्योगांवर झालेल्या परिणामांमुळे होत आहे.
भारतातील १३० वर्षे जुनी या कंपनीची गुड डे, मारी गोल्ड, टायगर, बॉर्बन यासह असंख्य उत्पादने आहेत. परंतु आता ह्या दरवाढीमुळे त्यांच्या विक्रीवर काय परिणाम होईल, हे लवकरच कळेल.