<
जळगाव – (प्रतिनिधी) – शहरातील चिन्मय हॉस्पिटल येथे चिन्मय हॉस्पिटलच्या डॉ. सोनाली महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
संपूर्ण वर्षभरात हॉस्पीटल मार्फत रुग्णसेवा करत असताना ऍडमिट असलेल्या अनेक रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते आणि रेडक्रॉस रक्तकेंद्राच्या माध्यमातून ही आवश्यकता वेळोवेळी पूर्ण होत असते.
रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यात आपणही योगदान द्यावे आणि वाढदिवसानिमित्त आणखी काही रुग्णांना जीवनदान द्यावे या भावनेतून चिन्मय हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल महाजन आणि त्यांच्या पत्नी डॉ. सोनाली महाजन यांच्या संकल्पनेतून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी त्यांच्या कर्मचाऱ्यांमधील आणि मित्र परिवारातील 45 रक्तदात्यांनी रक्तदान करून डॉ. सोनाली महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
भविष्यातही दरवर्षी या जीवनदायी कार्यात असेच योगदान देण्याचा संकल्प डॉ. राहुल महाजन आणि डॉ. सोनाली महाजन यांनी केला.
या उपक्रमासाठी डॉ. राहुल महाजन, डॉ.सोनाली महाजन, डॉ. दिपाली बडगुजर, डॉ. भूषण पाटील डॉ. उमेश सोनवणे, श्री. विनोद पाटील,श्री. स्वप्नील सोये, श्री. शुभम वाघ, डॉ. पूजा पाटील, डॉ. सुरज भाकड यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी रेडक्रॉसचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शंकर सोनवणे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सौ. सुनिता वाघ, सौ. दीक्षा पाटील आणि सहाय्यक श्री. किरण बावस्कर उपस्थित होते.