<
जळगाव-(जिमाका) – देशातील पोष्टांची सेवा सामाजिक व आर्थिक जीवनाचा एक अभिन्न अंग आहे. देशातील प्रत्येक नागरीकाच्या मनामध्ये पोष्टाच्या सेवेचे एक वेगळे स्थान आहे. तथापि, काही त्रुटींमुळे नागरीक पोस्टाच्या सेवेविषयी तक्रारी करतात. नागरीकांच्या तक्रारीचे पोस्टामार्फत तातडीने निराकरण करण्यात येते.
परंतु असे असूनही ज्या तक्रारींचे सहा आठवड्यात निराकरण झाले नसेल वा समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रादारांची दखल घेण्यासाठी अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांच्या कार्यालयात 23 सप्टेंबर, 2019 रोजी दुपारी 4.00 वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या डाक अदालतीमध्ये टपाल, स्पीड पोष्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, वचत बँक, मनीऑर्डर इत्यादि बाबतच्या तक्रारींचा समावेश करण्यात आला आहे. तरी डाकसेवेसंदर्भातील तक्रारदारांनी आपली तक्रार दोन प्रतीत अधिक्षक डाकघर कार्यालय, 1 ला मजला ,हेड पोस्ट ऑफिस बिल्डींग,जळगाव यांचे नावे अर्ज दिनांक 16 सप्टेंबर 2019 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत असे अधीक्षक ,डाकघर ,जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्ये कळविले आहे.