<
लोहारा-(ईश्वर खरे)-दिव्यांग बांधव भगिनी यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेताना अनेक संघर्षाचा सामना करावा लागतो.शारीरिक व्याधीने गिळंकृत असताना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खटाटोप करीत संबंधित कार्यालयाचे उंबरटे झिजवावे लागतात. कुठेतरी संबंधित अधिकारी यांना दिव्यांगाप्रति सहानुभूती असते किंवा नाही! याचा परिणाम म्हणून धडपड करणाऱ्या दिव्यांगांवर बिंब उमटते व हतबलता निर्माण होते, ही वेळ यायला नको या बांधिलकीतून दिव्यांग बांधव भगिनींचे न्याय हक्क मिळवण्यासाठी लोहारा, ता.पाचोरा येथे दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे .संस्थेला तथा प्रमुखांना दिव्यांग बांधव भगिनी यांचे न्याय हक्क अधिकार मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी लढा द्यावा लागणारच ,तेव्हा कुठेतरी संस्थेचे ध्येय साध्य होईल ही रणनीती सनदशीरपणे सुरू असताना नुसता लढा सुरू ठेवून चालणार नाही , तर सामाजिक बांधिलकी व उपक्रम म्हणून आज दिनांक ७ ऑगस्ट रविवार रोजी सन २०२१/२२ मध्ये दहावी उत्तीर्ण व बारावी उत्तीर्ण अशा बांधव भगिनी, दिव्यांग पाल्य यांना दिव्यांग एकता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शालेय साहित्य वाटप व दिव्यांग कक्ष पंचायत समिती पाचोरा यांच्या वतीने प्राप्त झालेले युनिक आयडी वाटप असा दुहेरी संगमाचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समिती पाचोरा दिव्यांग कक्ष अधिकारी ए.के महाले व प्रमुख अतिथी म्हणून विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन व भाजपा जेष्ठ नेते शरद आण्णा सोनार ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी,भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते सुनील क्षीरसागर ,रामेश्वरतांडा सरपंच दत्तात्रय राठोड, मधुकर कासार ,अनिल तडवी पत्रकार दीपक पवार, दिलीप चौधरी, कृष्णाराव शेळके ,अतुल माळी,म्हसास माजी सरपंच किसन पाटील आदी मान्यवर हजर होते .मान्यवरांचे व पत्रकारांचा सत्कार संस्थेच्या वतीने टोपी रुमाल व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्यांग एकता बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर राजपूत यांनी केले. तर आभार उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी मानले .दिव्यांग व दिव्यांग पाल्य यामध्ये यश विलास काळे, कीर्ती राजू भदाणे ,समृद्धी सुरेश पाटील, हर्षदा अनिल चौधरी, यश अनिल जगताप ,प्रसाद विकास ओतारी, पूजा प्रल्हाद कोळी यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.