<
नवी दिल्ली – (वृत्तसंस्था)
जर तुमचेही ‘या’ बँकेत खाते असेल, तर वेळीच हे काम करून घ्या, अन्यथा आपल्याला प्रचंड आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. ही बँक दुसरी तिसरी कोणी नसून ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ अर्थात ‘एसबीआय’ आहे.
एसबीआय बँकेच्या ग्राहकांना आपल्या नजीकच्या शाखेत जाऊन केवायसी अर्ज व्यवस्थित भरून, त्यास आधार कार्ड, पॅन कार्डच्या साक्षांकित प्रति व एक पासपोर्ट फोटो जोडून जमा करणे गरजेचे आहे. असे न केल्यास खातेधारकाच्या खात्याबरोबरच इंटरनेट बँकिंग व यूपीआय, योनो एप यासह अन्य सुविधाही बंद करण्यात येईल.
ज्यांची केवायसी करण्याची प्रक्रिया बाकी आहे, त्यांनी वेळीच ही प्रक्रिया पूर्ण केल्यास होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल.