<
शिक्षण क्षेत्रात विद्यार्थांना शिकवता शिकवता मनात सहज विचार येवून गेला किती बदलली ना आजची पिढी, शिक्षण, सर्व काही.. आणि आधीचा शिक्षणाचा काळ समोर येत गेला आधीच्या शिक्षणात पालकाचा सहभाग कमी होताआता शिक्षण पद्धती मधे लोकसहभाग वाढू लागला . आधीच्या काळात लोकसंख्येच्या मानाने शाळा कमी असायच्या विद्यार्थि संख्या चांगली होती शाळेची पटसंख्या देखील चांगली असायची.पण २१व्यां शतकाकडे वाटचाल सुरू झाली तसतसे चित्र पालटू लागले पारंपारिक शिक्षणाची जागा डिजिटल शिक्षण घेवू लागले. पालकांचं कल मराठी शाळे ऐवजी सेमी इंग्रजी, इंग्लिश मिडीयम शाळेकडे झुकायला लागला. मोठमोठ्या इमारती,भौतिक सुविधा, फाडफाड इंग्रजी बोलणारे शिक्षक तज्ञ पालकांना भुरळ घाल याला लागले.आपले मूल आजच्या स्पर्धांच्या काळात टिकले पाहिजे म्हणून मग पालक देखील मुलांना मोठ्या शाळेत टाकायला लागले. याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला मराठी शाळा ओस पडू लागल्या विद्यार्थि संख्या कमी झाली,आज काही मराठी शाळांचा शोकांतिका तर ही आहे की त्या बंदच झाल्या.मग आता जर आपली शाळा टिकवून ठेवायची असेल,प्रभाव दाखवायचं असेल तर काय करावं ? हा प्रश्न उभा राहिला. शाळेची फक्कत गुणवत्ता च नव्हे तर भौतिक विकास सुद्धा लोकांना दिसायला हवा हे शिक्षकांना मनोमन पटायला लागले. पण ? सरकार मोफत गणवेश,तांदूळ,पाठ्यपुस्तक याशिवाय काहीही मोफत देत नाही.आणि मग शाळेचा भौतिक विकास करण्यासाठी शाळेच्या विकासात लोकसहभाग ही संकल्पना पुढे आली.शाळेचा विकास करायचा असेल तर लोकांना आपल्या शाळेतील उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्या वे लागेल.आम्ही देखील शाळेतील विविध उपक्रमांमध्ये पालकांना सहभागी करून घेत असतो.त्यामुळे शाळेतील सर्व घडामोडी पालक जवळून बघत असतात ,शिक्षक पालक संवाद निर्माण होतो लोकसहभाग वाढत जातो मग पालकांना ही वाटतं फूल नाही फुलाची पाकळी तरी या उद्देशाने शाळेला मदत करतात.हा माझा शाळेतील लोकसहभागातून मला आलेला अनुभव आहे.याच लोकसहभागातून किती तरी शाळांनी आपल्या शाळेचे रूप बदलले आहे .मराठवाड्यात लोकसहभागातून तब्बल ६६ कोटी ४३ लाख रुपये उभारले .अलिकडचे च उदाहरण द्यायचं झालं तर वाबेलवडी शिरपूर पुणे येथील जिल्हा परिषद ची शाळा ही झीरो एनर्जी इंटरनॅशनल स्कूल म्हणून जगात ३ रा नं वर आहे भारतात १ न आहे. या शाळेतील वारके सर यांनी लोकसहभागातून संरक्षण भिंत, रंग, संगणक, t.v, tablet, e लर्निग, डिजिटल शाळा, फरशी,वर्गखोल्या गावकऱ्यांनी स्वतःहून बांधून दिल्या. यासर्व गोष्टीमुळे शाळेचे रूपडे पालटले आहे. आज तेथे ४०० विद्यार्थि शिकत आहे तर ४००० विद्यार्थि वेटींग लिस्ट वर आहे.ही शाळा जि. प. ची असली तरी या शाळेला भेट देण्यासाठी देश_ विदेशातील लोक येत असतात. हे सर्व लोकसहभागातून शक्य झाले. शाळेच्या विकासात लोकसहभाग चे महत्व यापेक्षा सुंदर उदाहरण अजून काय असू शकते!
सुवर्णा अडकमोल – (शिक्षिका -सरस्वती विद्या मंदिर)
मो.नं- 7350097131