<
धरणगांव(प्रतिनीधी)- तंबाखूमुक्त शाळांचा जळगाव जिल्हा घोषित करण्याच्या अनुषंगाने आज इंदिरा कन्या विद्यालय धरणगाव येथे सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची तंबाखूमुक्त कार्यशाळा गटशिक्षणाधिकारी ए.पी. बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडली. तंबाखूमुक्त शाळा तालुका समन्वयक संजय गायकवाड यांच्यासोबत दीपक भट,संजय पाटील यांनी तंबाखूमुक्त शाळा उद्देश महत्व याविषयी मार्गदर्शन केले. तसेच संजय गायकवाड यांनी तंबाखू मुक्त शाळेसाठी आवश्यक ११ निकष सविस्तरपणे पुराव्यानिहाय समजून सांगितले. यावेळी तालुक्यातील तंबाखूमुक्त झालेल्या जाभोरे, धरणगाव, मुसई खु व वंजारी या शाळेतील तंबाखुमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या शिक्षकांचा विस्तार अधिकारी श्री. बिऱ्हाडे साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मा. बिऱ्हाडे साहेब यांनी ही लवकरात लवकर आपली शाळा तंबाखूमुक्त करण्याचे आवाहन केले. यावेळी सर्व केंद्रप्रमुख, विषयशिक्षक, विषयतज्ज्ञ उपस्थित होते.कार्यक्रमाला जिल्हा समन्वयक जयेश माळी व जिल्हा सदस्य राज मोहम्मद शिकलगर यांनी भेट दिली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय गायकवाड, दिपक भट,संजय पाटील,व इंदिरा कन्या चे बयस सर यांनी परिश्रम घेतले.