<
सोयगाव – (प्रतिनिधी) – जय कालिंका देवी शिक्षण संस्था सावळदबारा संचलित शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सावळदबारा व कै लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील वरिष्ठ महाविद्यालय सावळदबारा यांच्या संयुक्त विद्यमाने 75 व्या भारत स्वातंत्र्य च्या अमृत महोत्सव निमित्त आज शासनाच्या परिपत्रकानुसार सकाळी 11 वाजता शाळेच्या क्रीडांगण मध्ये समूह राष्ट्रगाणं घेण्यात आले.
याप्रसंगी संस्था अध्यक्ष भाऊराव लक्ष्मणराव कोलते यांनी सर्वांना मार्गदर्शन केले व भारतातील शूरवीर हुतात्मे व स्वातंत्र्यवीर यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कशाप्रकारे आपले विचार व कर्मातून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले याबद्दल मार्गदर्शन केले.
नंतर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली त्यांच्या विचारावर आपण मार्ग क्रमन करावे असे सांगितले याप्रसंगी प्राचार्य नारायण कोलते केंद्रप्रमुख श्रीमती शीलाताई राठोड व संस्था सचिव श्रीमती रत्नाताई नारायणराव कोलते व प्रत्येकाने तिरंगा ध्वज आपल्या घरावरती लावावा व त्याची जबाबदारी करावी व हा अमृत महोत्सव अगदी आनंदात व शांततेत पार पाडावा हीच खरी भारतासाठी स्वातंत्र्य दिलेल्या हुतात्म्यांना व शहीद जवानांना आपल्याकडून श्रद्धांजली राहील असे प्राचार्य ने सांगितले.
आजच आमच्या व्हाटसअॅप समुहात सामिल व्हा
https://chat.whatsapp.com/DH1FAtPsumXFnRUlaZ3Qf8
यावेळेस शाळेतील सर्व शिक्षक विजय सिंग राजपूत सुदाम राठोड विनोद जाधव भास्कर खमाट मुकुंदा व्यवहारे श्रीकृष्ण सोनवणे भास्कर ससाने संजय जोशी विकास पाटील ज्ञानेश्वर राठोड पोपटराव सोनवणे भूषण देसले श्याम जाधव अजबराव चव्हाण पंजाबराव शेळके सतीश गावंडे दिलीप सिसोदे अजय रबडे योगेश थोटे गणेश मोहने बाबासाहेब कोलते व विद्यार्थी उपस्थित होते, अशी माहिती जीवन कोलते यांनी दिली तसेच शिक्षक मित्र देखील उपस्थित होते.