<
मुक्ताईनगर – (प्रतिनिधी) – येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात परिसरातील शेतकऱ्यांनी भेट दिली. कृषी विभाग महाराष्ट्र शासन तालुका कृषी अधिकारी मुक्ताईनगर यांच्यामार्फत आयोजित करण्यात आले होते.
प्रदर्शनात लोकांना रान भाज्यांचे महत्त्व सांगण्याकरिता कृषी विभागामार्फत रान भाज्यांचे विवरण, त्यांच्या औषधी गुणधर्म, त्याचबरोबर लिखित स्वरूपात तसेच युट्युब च्या क्यू.अर. कोड माध्यमातून देण्यात आली. त्या संदर्भात तालुका कृषी अधिकारी श्री अभिनव माळी यांनी सांगितले की रान भाज्यांचे औषधी महत्त्व बरोबर जर लोकांना पाककृती सांगितल्यावर लोक रान भाज्यांचा वापर दैनंदिन वापरात करतील.
कार्यक्रम आयोजनाचे उद्देश्य लोकांना रानभाज्यांचे महत्त्व कळावे व दैनंदिन आहारात त्यांचा समावेश व्हावा याकरिता करण्यात आला होता. कार्यक्रमात तालुक्यातील प्रगतशील शेतकरी श्री राजेंद्र मुरलीधर कांडेलकर व मानवता फार्म तलखेदा यांनी उटफर्त सहभाग घेऊन आपल्या निविष्ठा विक्रीस ठेवल्या. कार्यक्रमाला मफदा चे अध्यक्ष श्री विनोदभाऊ तराड, सौ. रोहिणी ताई खडसे, तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती श्वेता संचेती मॅडम, तालुक्याचे पोलीस निरीक्षक श्री संजय शेळके व इतर अधिकारी पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी श्री अभिनव माळी मंडळ कृषी अधिकारी श्री नितीन पगार कृषी पर्यवेक्षक श्री अशोक पाटील व सर्व कृषी विभागाचे कर्मचारी वृंदा उपस्थित होत्या.