<
जळगाव-(प्रतिनिधी) – भारत देशाचा ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. या अनुषंगाने जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाबाहेर ७५ फुट उंच ध्वजस्तंभ उभारण्यात येत असून यंदाच्या स्वातंत्र्यदिनाचे झेंडावंदन या अतिउंच राष्ट्रध्वजाला सलामी देऊन होणार आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात मुख्य रस्त्याला लागून हा अतिभव्य ध्वजस्तंभ आणि तिरंगा दिमाखात डोलणार आहे.
२५ ते ३० कुशल बांधकाम कामगार दिवसरात्र यासाठी झटत आहेत. फाऊंडेशन निर्मितीसह अवाढव्य अशा ध्वजस्तंभाला उभे करण्यापर्यंतच्या कामाची जबाबदारी अभियंता यशोधन तायडे यांच्या खांद्यावर आहे. डोक्याच्या टोप्या सांभाळा..
भव्य ध्वजाचे काम युद्धपातळीवर सुरू…
२७ जुलैपासून युद्धपातळीवर या झेंड्यासाठी फाऊंडेशन निर्मितीचे काम सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांतकुमार येळई यांच्या मार्गदर्शनात शाखा अभियंता यशोधन तायडे. म्हणून काम पाहत आहेत.
७ फूट उंच चौथऱ्यावर ७५ फूट उंच ध्वजस्तंभ अन् त्याला २० बाय ३० फुटाचा अतिभव्य राष्ट्रध्वज डौलात फडकणार आहे.
१५ ऑगस्टपूर्वीच काम पूर्ण होणार…
संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयांवर भव्य दिव्य राष्ट्रध्वज उभारण्याचा अध्यादेश पारीत झाले असून जिल्हा प्रशासनाने तातडीने आदेश आल्याच्या दिवसापासून (दि. २७) कामाला सुरवात केल्याने १५ ऑगस्टपूर्वीच काम पूर्ण होऊन झेंडावंदनही होईल.
असा असेल ध्वज….
साधारण ७ फूट उंच अन् १५ बाय १५ फूट चौथऱ्यावर ७५ मीटर कठीण • गॅल्वोनेजपासून बनवलेला ध्वजस्तंभ, सोबत ध्वजासाठी हायमस्ट लॅम्प, खालून वरच्या दिशेने पंधरा फूट फ्लड लाईट, ३० बाय २० फूट भव्य राष्ट्रध्वजासाठी धातूचे रोपवायर, १ हॉर्सपावरच्या विद्युत मोटारीने ध्वजारोहणासह मॅन्युअली ध्वज खाली-वर करण्याची सुविधा असेल अशी माहिती शाखा अभियंता यशोधन तायडे यांनी सत्यमेव जयते वेब न्युज चॅनल च्या प्रतिनिधी यांना दिली.
भव्यदिव्य राष्ट्रध्वजाला बघण्यासाठी जिल्ह्यातून नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या दर्शनी भागात एका बाजूला भारत-पाक युद्धात शौर्य गाजवणारा रणगाडा, तर भारत चीन युद्धात वापर झालेली तोफ आणि मधोमध राष्ट्रध्वज राहणार असल्याने सेल्फीप्रेमींची फेाटोसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.