<
गुंतवणूक न्युज-
बँकेत फिक्स्ड डिपॉझिट करणे हा भारतामध्ये गुंतवणुकीचा सर्वात सुरुक्षित पर्याय मानला जातो. तुम्हीही फिक्स्ड डिपॉझिट करत असाल तर FD च्या नियमात मोठा बदल झाला आहे ज्याची माहिती तुम्हाला असायलाच हवी. RBI ने काही दिवसांपूर्वी FD शी संबंधित नियमात बदल करुन नवीन नियम लागू केले आहेत.
RBI च्या रेपो दरात वाढ करण्याच्या निर्णयानंतर अनेक सरकारी आणि गैर-सरकारी बँकांनीही FD वरील व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे FD करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचायलाच हवी. अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. FD च्या मॅच्युरिटीचे नियम बदलले RBI ने FD च्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे की आता मुदतपूर्तीनंतर, जर तुम्ही रकमेवर दावा केला नाही तर तुम्हाला त्यावर कमी व्याज मिळेल.
हे व्याज बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाइतके असेल. सध्या, बँका 5 ते 10 वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या FD वर 5% पेक्षा जास्त व्याज देतात. तर बचत खात्यावरील व्याजदर सुमारे 3 ते 4 टक्के आहे.
RBI ने दिलेल्या माहितीनुसार, जर FD मॅच्युअर झाली आणि त्यावर दावा केला गेला नाही, तर बचत खात्यानुसार त्यावर व्याज दर किंवा मॅच्युअर FD वर निश्चित केलेला व्याजदर, यापैकी जे कमी असेल ते दिले जाईल.
सर्व व्यावसायिक बँका, लघु वित्त बँका, सहकारी बँका, स्थानिक प्रादेशिक बँकांमधील ठेवींवर हे नवीन नियम लागू होतील. करदात्यांना मोठा झटका, सरकारने अटल पेन्शन योजनेत केले बदल पूर्वी, जेव्हा तुमची FD मॅच्युअर झाली आणि तुम्ही ती काढली नाही किंवा दावा केला नाही, तर बँक तुमची FD त्याच कालावधीसाठी वाढवत असे ज्यासाठी तुम्ही आधी FD केली होती. पण आता असे होणार नाही. आता जर मुदतपूर्तीवर पैसे काढले नाहीत तर त्यावर एफडीचे व्याज मिळणार नाही. त्यामुळे मॅच्युरिटीनंतर लगेच पैसे काढले तर बरे होईल आणि होणाऱ्या आर्थिक नुकसानापासुन तुम्ही वाचाल…
Comments 1