<
जळगाव – (प्रतिनिधी) – धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव आणि शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार दिन साजरा करण्यात आला
कार्यक्रमाप्रसंगी मंचावर प्राचार्य राजेंद्र वाघुळदे , प्राचार्य डॉ. राकेश चौधरी, वक्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रासोयो विभाग जळगाव येथील विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. नितीन बडगुजर, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. जुगल घुगे, डॉ. राजकुमार लोखंडे महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. कल्पना भारंबे कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रीती बोंडे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी ११ ऑगस्ट २०१८ रोजी आपल्या विद्यापीठाचे नाम विस्तारा झाला. त्याकाळातील काही महत्त्वपूर्ण प्रसंग नमुद केले. त्यासोबतच स्वातंत्र्याची ७५ पंचाहत्तरी म्हणजेच “अमृत महोत्सव आपण साजरा करीत असतानां दि. ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधी दरम्यान धनाजी नाना चौधरी या संस्थेच्या माध्यमातून तसेच दोन्ही महाविद्यालयाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न होत आहे याची माहिती दिली.
खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. “बहिणाबाईंची गाणी खान्देशच अस्सल संचित” या विषयावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रासोयो जळगांव विभागाचे समन्वयक डॉ. नितीन बडगुजर यांनी बहिणाबाईचे काव्यसंग्रह हा जन माणसांपर्यंत गाण्यातून पोहोचला आहे. कधीही पुस्तक न वाचलेली, कोणत्याही विद्यापीठाबद्दल माहिती नसलेली, अडाणी निरक्षर परंतु जगाला तत्त्वज्ञान देणारी बहिणाबाई आहे. त्याला कारण ही तसेच आहे बहिणाबाईंच्या ओव्यांमधून खान्देश परंपरेच दर्शन होते. खान्देशातला निसर्ग खान्देशातला माणूस त्याचे कष्ट माणसा – माणसातील लपलेलं माणूस पण हे बहिणाबाईंच्या ओव्यांमधूनच जाणवते.
माझ्या आजच्या युवकांसाठी देखील बहिणाबाईंची ओवी आहे. “मन लहरी लहरी त्याले हातीं धरे कोन.? मन हे अतिशय लहरी असते, वाऱ्यासारखं अस्तव्यस्त असते त्याला कोणी हातात धरू शकत नाही ते उनाडपणे इकडे तिकडे फिरते. देव नाही देव्हाऱ्यात देव कष्टात आणि कर्मात आहे.
बहिणाबाईंच्या प्रत्येक ओवी स्पृहनिय आहे. शब्दंशब्द अर्थपुर्ण आहेत. त्यातूनच आपल्या जीवनाचा सार उलगडतांना आपल्याला दिसतो असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी ११ ऑगस्ट २०१८ रोजी विद्यापीठ नामनिस्ताराची झाला आणि आपल्या संस्थेने बहिणाबाईंचे आसोदा येथील माहेर आणि जुने जळगाव येथील सासर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून बहिणाबाईंच्या काव्याप्रमाणे सजीव देखावे करीत शोभायात्रा काढली. धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संस्थेने तो दिवस जल्लोष उत्सवात साजरा केला. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आपण आपल्या विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव दिले गेले त्यामुळे, या प्रक्रियेतील सर्व घटकांचे लोकप्रतिनिधींचे आणि संपूर्ण खान्देवासीयांचे आपल्या संस्थेच्या वतीने आभार मानतो.
बी.एस.डब्ल्यू द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी रिद्धी कापडे “अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला’ ‘देखा पिलासाठी तिनं झोका झाडाला टांगला” ही कविता म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. कल्पना भारंबे यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे समन्वय प्रा. डॉ. निलेश चौधरी, डॉ. मिलिंद काळे आणि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने केले गेले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.