<
लोहारा (ईश्वर खरे) येथील धी शेंदुर्णी सेकं एज्यु- को -ऑप सोसा द्वारा संचलित, डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा, ता. पाचोरा येथील विद्यालयात दि. 12 -8 -2022 वार शुक्रवार रोजी शेंदूर्णी येथील नामवंत व जळगांव जिल्ह्यात नावलौकिक असलेल्या राणी लक्ष्मीबाई महिला पतसंस्था मर्या शेंदुर्णी व धी शेंदुर्णी शिक्षण संस्था शेंदुर्णी तालुका जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त 100 वृक्षांचे वृक्षारोपण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यालयात करण्यात आले. या सोहळ्याचे अध्यक्ष संस्थेचे सचिव श्री सतीशचंद्रजी काशीद होते. प्रथम अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कै. आचार्य बापूसाहेब गरुड, हरीप्रसाद महाराज, कै .अण्णासाहेब गरुड, विद्यामाता सरस्वती प्रतिमांचे पूजन करण्यात आले .यानंतर उपस्थित मान्यवरांचे सत्कार व स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षिका, ज्येष्ठ शिक्षक यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांमध्ये शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या महिला संचालिका सौ. उज्वलाताई काशीद, राणी लक्ष्मीबाई पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. रेखाताई झवर, संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. वर्षाताई पिसे सर्व राणी लक्ष्मीबाई पतसंस्थेचे पदाधिकारी ,दैनिक तरुण भारतचे अध्यक्ष रवींद्रजी लड्डा, तरुण भारत व्यवस्थापक मनोजजी महाजन, राणी लक्ष्मीबाई संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय उत्तम दादा थोरात ,तरुण भारत वृत्तपत्राचे पत्रकारशेंदूर्णी येथील अतुलजी जहागीरदार, गट शिक्षणाधिकारी श्री .एन. एफ .चौधरी ,पाचोरा सहाय्यक निबंधक अधिकारी भागवत पाटील ,माजी मुख्याध्यापक अ अ पटेल ,लोहारा येथील सरपंच अक्षयकुमार जैस्वाल, ग्रामपंचायत सदस्य अमृत चौधरी ,कैलास चौधरी, दिपक खरे, विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष शरद सोनार, गावातील जेष्ठ नागरिक डिगंबर चौधरी ,शिवराम भडके साहेब,सामाजिक कार्यकर्ते सुनील क्षीरसागर ,विकास देशमुख, प्रभाकर काळू चौधरी, दत्तू भिका क्षीरसागर , श्रीराम कलाल, म्हसास येथील भारत पाटील, पत्रकार कृष्णराव शेळके ,दीपक पवार, ईश्वर खरे, दिनेश चौधरी, रमेश शेळके ,मुख्याध्यापक श्री आर एस परदेशी ,पर्यवेक्षिका सौ. यु डी शेळके ,ज्येष्ठ शिक्षक पी एम सुर्वे ,डी एम गरुड ,वाय पी वानखेडे ,आर सी जाधव , एस एस गुजर ,आर जी बैरागी, एस डी पाटील, पी ए सोनार इ. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधु भगिनी कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री आर एस परदेशी यांनी केले. मान्यवरांमधून रवींद्र लड्डा, उत्तमराव थोरात, गटशिक्षणाधिकारी एन एफ चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगताद्वारे सतीश चंद्रजी काशीद यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे महत्व व या वृक्षारोपणाचे आयोजन करणाऱ्या पतसंस्थेचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री व्ही एम शिरपुरे यांनी केले. तर आभार पत्रकार अतुलजी जहागीरदार यांनी मानले .यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 100 वृक्षांचे वृक्षारोपण विद्यालयात करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक , शिक्षकेतर, कर्मचारी बंधू, भगिनी ,वस्तीग्रुह कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.