<
जळगाव: ईकरा शिक्षण संस्था संचलित ईकरा एजूकेशनल कॉम्प्लेक्स, ईकरा नगर, मोहाडी कॅम्पस, जळगाव येथे आज दि.१५ ऑगस्ट, २०२२ रोजी भारताचा ७५ वा स्वातंत्र दिवस साजरा करण्यात आला. ईकरा शिक्षण संस्थेचे मा. अध्यक्ष डॉ. अ. करीम सालार साहेबांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर कॅम्पस मधील इकरा बी.एड. कॉलेजचे प्र. प्राचार्य प्रा. इरफान शेख, इकरा डी.एल.एड. कॉलेजची प्राचार्या प्रा. सईदा वकील, इकरा युनानी मेडीकल कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. शोएब शेख व इकरा पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक श्री. जमीर काजी यांनी मागील काही दिवसात “आझादी का अम्रित महोत्सव” निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचे अहवाल सर्वांसमोर सादर केली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. अ. करीम सालार यांनी मागील २३ वर्षा पासून दरवर्षी नियमितपणे इकरा कॅम्पस मध्ये ध्वजारोहण करण्याची संधी अल्लाहने दिली म्हणून सर्व प्रथम अल्लाहचे आभार मानले व सर्व उपस्थितांना स्वातंत्र दिनाच्या सुभेच्छा दिल्या. मा. अ. करीम सालार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना सांगितलेकी, देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र मिळून आज ७५ वर्षे झाली तरी आजही देशात भ्रष्टाचार, गरिबी व अन्याय अशा अनेक बाबींपासून स्वातंत्र मिळविण्यासाठी पुढील येणाऱ्या पिढीने व विद्यार्थांनी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच भारत सरकारच्या अग्निपथ योजनेचे व अग्निवीर म्हणून देशसेवेच्या मिळणाऱ्या संधीचे महत्व उपस्थितांना समजावून दिले.
स्वातंत्र दिना निमित्ताने इकरा पब्लिक स्कूल तर्फे वृक्षारोपण तर इकरा बी.एड. व डी.एल.एड. कॉलेज तर्फे पोस्टर प्रेझेंटेशन ठेवण्यात आले होते. मा. अध्यक्ष डॉ. अ. करीम सालार साहेबांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमात इकरा बी.एड. कॉलेज, इकरा डी.एल.एड. कॉलेज, इकरा युनानी मेडीकल कॉलेज व हॉस्पिटल व इकरा पब्लिक स्कूलचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.