<
सुलवाडी ते ओंकारेश्वर भव्य कावड यात्रेतील भक्ताना आश्रय फौंडेशन चे अध्यक्ष श्री. डॉ. कुंदन सुधाकर फेगडे यांच्या वतीने मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी व औषध वाटप
आज दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रविवार रोजी भोकरी तालुका रावेर जवळ असलेले श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे श्री क्षेत्र सुलवाडी ते श्री क्षेत्र ओंकारेश्वर पर्यत भव्य कावड यात्रा काढली जाते. या यात्रेची रविवार रोजी सायंकाळी समाप्ती झाली.ज्या भक्ताना यात्रेत येताना शरीराला काही दुखापत झाली किंवा ज्यांना शारीरिक त्रास होत होता अश्या भक्ताची आश्रय फौंडेशन चे अध्यक्ष श्री डॉ. कुंदन सुधाकर फेगडे यांनी मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी, व औषध वाटप केली.
तसेच श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थानावर नतमस्तक होऊन दर्शन घेतले. या वेळी कावड यात्रेत पाई यात्रेत आलेल्या भक्ताचे श्री डॉ. कुंदन फेगडे यांनी मोफत रुग्णसेवा केल्याबद्दल त्यांचे कावड यात्रा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला