<
अमळनेर-(प्रतिनिधी) – येथील पं. ज. ने. समाजकार्य महाविद्यालय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक श्री अभिजीतभाऊ भांडारकर, डॉ महेश रमण पाटील, सी.आय.एफ जवान श्री हर्षल धनगर, श्रीमती अनुरूपा काकडे, प्राचार्य डॉ. पी एस पाटील, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विनोद वैद्य, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ अस्मिता सरवैया, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा विजयकुमार वाघमारे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ अनिता खेडकर, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा चंद्रशेखर बोरसे, क्रीडा संचालक डॉ श्वेता वैद्य, कार्यालयीन अधीक्षक श्री अनिल वाणी तसेच प्राध्यापक डॉ भरत खंडागळे, डॉ एस आर चव्हाण, प्रा डी आर ढगे, प्रा उदय महाजन, शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. महेश रमण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. उपस्थितांनी ध्वजास वंदन करून सुप्रीम पाटील, दिपक विश्वेश्वर या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी देशभक्तीपर गीत सादर केले. सोनल अमृत भोई व प्रियंका भोई या विद्यार्थिनीने ध्वज गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रा उदय महाजन यांनी केले.