जळगाव – (प्रतिनिधी) – येथे १५ ऑगस्ट स्वतंत्र दिणाचे अवचित्त साधून ७५ वा अमृत महोत्सव निमित्ताने रिक्षा व व्हन चालक – मालकां – मार्फत रॅली जी. एस. ग्राउंड येथून आयोजित करण्यात आली.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हर घर तिरंगा हे देशव्यापी अभियान राबविण्यात आले व या अभियानाचा भाग होऊन रिक्षा व व्हन चालक मालकांनी एक नवीन आदर्श समोर ठेऊन नावीन्यपूर्ण उपक्रम राबून देशात एक उत्साह पूर्ण संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.
रॅली प्रसंगी प्रमुख पाहुणे – प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही साहेब यांनी झेंडी दाखवून रॅलीस सुरवात केली व इतर परिवहन अधिकारी यांची उपस्थिती होती,
रॅली प्रसंगी रिक्षा युनियन जिल्हाध्यक्ष – दिलीपभाऊ सपकाळे यांनी मनोगत व्यक्त केले त्यांनी स्वातंत्र्य साठी ज्यांनी लढा दिला त्यांचा जीवनावरील काही पैलू सपकाळे यांनी उपस्थित केले आज आपण व्यक्ती स्वतंत्र आहोत आणि हा अधिकार आपणास भारतीय संविधान मार्फत मिळाला आहे.
या स्वतंत्र दिनाचा ७५ अमृत महोत्सव आज आपल्या सारखा रिक्षा चालक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब आपल्याला लाभले आहेत.तसेच वीर सावरकर
रिक्षा युनियन व शालेय विद्यार्थी व्हन वाहतूक संघटना तसेच स्कूल बस- व्हन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिलिपभाऊ सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली रॅली संपन झाली.
रॅली यशस्वीेतेसाठी संजय पाटील,भरत वाघ,मुकूंद सपकाळे, भानुदास गायकवाड,वाल्मीक सपकाळे,बापू कुमावत,राजेंद्र पाटील,नाना भोई,प्रकाश पाटील,गणेश शिंदे, रवींद्र पाटील,राजू चौधरी ,मिलिंद अहिरे, अहिरराव,संजय जोशी,किशोर पाटील,सचिन चौधरी,कैलास विसपुते,शशिकांत जाधव,विलास ठाकूर, पोपट ढोबळे,एकनाथ बारी, किसन पाटील, उतम पाटील,भरत पाटील,नंदू भाऊ,नंदू पाटिल,रणजित नाईक,आदी रिक्षा व व्हन चालक मालकांनी परिश्रम घेतले .