<
न्युज नेटवर्क – सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय टपाल विभागात १ लाखांहून अधिक जागांसाठी मेगाभरती पार पडणार आहे.
त्यासाठीची अधिसूचना केंद्र सरकार कडून जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
कोणत्या पदांसाठी किती जागा-
पोस्टमन- 59,099
मेलगार्ड- 1445
मल्टी- टास्किंग पोस्ट- 37,539
महाराष्ट्रात किती जागा-
पोस्टमन-9884
मेलगार्ड- 147
मल्टी- टास्किंग पोस्ट- 5478
वयोमर्यादा-
कमीत कमी- १८ वर्ष
जास्तीत जास्त- ३२ वर्ष
शैक्षणिक पात्रता-
- उमेदवार दहावी उत्तीर्ण असले पाहिजेत आणि त्यांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- काही पदांसाठी उमेदवारांनी इंटर किंवा इयत्ता 12 वी पूर्ण केलेली असावी.
- तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलंल आहे.
- उमेदवारांना पदाचा किमानसंबंधित अनुभव असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
असा करा अर्ज-
- सर्वप्रथम इंडिया पोस्ट indiapost.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा
- मुख्यपृष्ठावरील भर्ती लिंकवर क्लिक करा
- तुम्हाला अर्ज करायचे असलेले पोस्ट निवडा, पात्रता निकष तपासा
- स्वतःची नोंदणी करा
- फॉर्म भरा (India Post recruitment 2022 )
- फी भरा आणि सबमिट करा
- पुढील वापरासाठी पोचपावती फॉर्म डाउनलोड करा, सेव्ह करा आणि प्रिंट आउट घ्या.