Wednesday, May 7, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

व्हॅक्सिंग करताय…मग या गोष्टी कराच…स्किनवर येईल ग्लो….

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/08/2022
in लाइफस्टाइल
Reading Time: 1 min read

फिटनेस न्युज – व्यक्तिमत्त्व आकर्षक आणि सुंदर दिसावे, यासाठी मुली कित्येक उपाय करत असतात. त्वचा आणि केसांशी संबंधित प्रत्येक समस्येवर हल्ली विविध प्रकारचे उपचार देखील उपलब्ध आहेत.

धावपळीच्या जीवनामुळे घरामध्ये योग्य पद्धतीने ब्युटी केअर रुटीन फॉलो करणं शक्य नसल्याने बहुतांश जणी पार्लरमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेतात, यापैकीच एक उपाय म्हणजे व्हॅक्सिंग. व्हॅक्सिंगमध्येही वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. पण ही प्रक्रिया अतिशय त्रासदायक असते. विशेषतः संवेदनशील त्वचा (Skin Care Tips) असणाऱ्यांना व्हॅक्सिंगमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

व्हॅक्सिंगनंतर त्वचेवर बारीक पुरळ येणे, त्वचा लालसर होणे आणि खाज सुटणे इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो.व्हॅक्सिंग करताना हात-पायावरील केस जोरात खेचल्यानं आणि तुटल्याने त्वचेवरील रोमछिद्रे (पोअर्स) मोकळी होतात, असे म्हणतात. ओपन पोअर्समध्ये बॅक्टेरियांच्या प्रवेशामुळे त्वचेवर बारीक पुरळ येतात. पण तुम्ही जर का व्हॅक्सिंग करण्यापूर्वी आठवणीने ‘या’ गोष्टी केल्या तर त्यामुळे तुमच्या त्वचेवर आपोआप ग्लो येईल आणि तुम्हाला व्हॅक्सिंग करतांना त्रासही होणार नाही.चला तर मग बघू या कोणत्या आहेत त्या गोष्टी..

व्हॅक्स नियमितपणे केल्यामुळे त्वचेवरील अनवॉण्टेड केस निघून जातात आणि त्वचा अधिक स्वच्छ होते, हे अगदी खरे.पण यापेक्षा अधिक चांगला फायदा व्हॅक्स केल्यानंतर मिळावा, असे वाटत असेल तर या काही ट्रिक्स फॉलो करा. या गोष्टी केल्यामुळे त्वचेवरचे टॅनिंग निघून जाते, त्वचा उजळलेली दिसते आणि त्वचेवर एक वेगळाच ग्लो येतो.हात आणि पायाचे व्हॅक्स करणे हे आता खूपच कॉमन आहे. महिन्यातून एकदा किंवा ग्राेथ जास्त असेल तर दोनदा पार्लरमध्ये जाऊन व्हॅक्स करणाऱ्या महिलांची, तरुणींची संख्या मोठी आहे.

व्हॅक्स केल्यानंतर अनेक जणांची त्वचा कोरडी झाल्यासारखी दिसते. किंवा व्हॅक्स केल्यानंतर अनेक जणांना स्ट्रॉबेरी स्किनचाही त्रास जाणवतो.त्वचेला व्यवस्थित मॉईश्चराईज न केल्यामुळे हा त्रास जाणवतो. त्यामुळे जेव्हा व्हॅक्स करणार असाल, त्याच्या २ ते ३ दिवस आधी व्यवस्थित बॉडी मसाज करा. यामुळे त्वचेचे योग्य पद्धतीने पोषण होईल आणि त्वचा व्हॅक्ससाठी तयार होईल.

व्हॅक्सिंग करण्यापुर्वी क्लिंजर व्हॅक्स देखील करावे. क्लिंजर व्हॅक्स हे एक विशिष्ट प्रकारचं ऑईल असतं. या ऑईलने त्वचेला मसाज केल्यानंतर त्वचा आणखी स्वच्छ होते आणि व्हॅक्स केल्यानंतर मुलायम चमकदार होते. ज्यांना स्ट्रॉबेरी स्किनचा त्रास आहे, त्यांनी क्लिंजर व्हॅक्स नक्की करावेव्हॅक्स करण्यापुर्वी स्वच्छ आंघोळ करूनच पार्लरमध्ये गेले पाहिजे. व्हॅक्सिंग करण्याच्या एक दिवस आधी त्वचेचे स्क्रबिंग करायला विरू नका. यामुळे त्वचेवरची डेड स्किन बऱ्याच प्रमाणात निघून जाते आणि जी काही उरलेली डेड स्किन असेल ती व्हॅक्सदरम्यान निघून जाते.

आंघोळ करताना फोम किंवा लुफा वापरून त्वचा स्वच्छ करा. यामुळे हेअर फॉलिकल्सच्या आजूबाजूला असलेली घाण स्वच्छ होईल आणि केस चटकन निघून येण्यासाठी मदत होईल.व्हॅक्स करण्याच्या एक- दोन तास आधी गरम- गरम पाण्याने आंघोळ करा. यामुळेही त्वचेवरील रंध्रे मोकळी होतात आणि व्हॅक्स करताना कमी त्रास होतो. बॉडीमसाज नंतर व्हॅक्स केल्याने त्वचेचा पोत सुधारण्यास आणि त्वचा अधिक चमकदार होण्यास निश्चितच मदत होते.

खास टिप : मासिक पाळीदरम्यान व्हॅक्सिंग करू नये, कारण या दिवसांत आपली त्वचा अधिक संवेदनशील असते. व्हॅक्सिंग केल्यानंतर लगेचच प्रदूषण किंवा गरम-दमट वातावरण असणाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

धक्कादायक;भेसळयुक्त ४००० हजार लिटर दुध जप्त…

Next Post

BECIL कंपनीत भरती, 75 हजार मिळेल पगार, आजच करा अर्ज

Next Post

BECIL कंपनीत भरती, 75 हजार मिळेल पगार, आजच करा अर्ज

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिल पासून अकरावे अधिवेशन

कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिल पासून अकरावे अधिवेशन

विश्व नवकार महामंत्राच्या दिवशी नऊ संकल्पातून सृष्टीचे संवर्धन करुया –  पंतप्रधान नरेंद्र मोदी

विश्व नवकार महामंत्राच्या दिवशी नऊ संकल्पातून सृष्टीचे संवर्धन करुया – पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत जळगाव महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मंजुरी;आ.सुरेश दामू भोळे यांच्या पाठपुराव्याला यश

स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत जळगाव महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मंजुरी;आ.सुरेश दामू भोळे यांच्या पाठपुराव्याला यश

तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास उत्साहात प्रारंभ

तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास उत्साहात प्रारंभ

उच्च शिक्षण विभागाकडे हस्तांतरणाची प्रक्रिया- समस्या आणि उपाययोजना एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

उच्च शिक्षण विभागाकडे हस्तांतरणाची प्रक्रिया- समस्या आणि उपाययोजना एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    सत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.
    %d

      Notifications