<
गड किल्ल्यांच्या सेवेसाठी छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान चे मावळ्यांनी अजंठा-सातमाळा या सह्याद्रीच्या पूर्वपश्चिम उपरांगेवर मोक्याच्या ठिकाणी अंतुरगड ठाण मांडून बसलेला आहे. हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुकामध्ये आहे..
अशा या निसर्गरम्य परिसरात अंतुर किल्यावर रविवार १४ आगस्ट २२ रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
सदर मोहिमेसाठी जळगाव पारोळा धुळे व चाळीसगाव येथुन मावळे उपस्थितीत होते..या प्रसंगी गडाच्या तिन्ही दरवाजे पाशी गवत व काटेरी झुडपे काढण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजची पुजा व ध्वजारोहण करुन राष्ट्रगीत झाले.. तिरंग्याला सलामी देऊन संपूर्ण गडावरुन सहा पिशव्या प्लास्टिक जमा करण्यात आले..मोहीम यशस्वी करण्यासाठी तुकाराम मराठे, निलेश मराठे, राहुल पवार, गणेश मोरे, आकाश सपकाळे, प्रविण पवार, ज्ञानेश्वर माळी, सुनील सोनवणे, राहुल मोरे व गडांचे सुरक्षा रक्षक आदी नी मेहनत घेतली.. मोहीमेला उपस्थित असलेल्या सर्व मावळ्यांचे छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रविण मोरे यांनी मनस्वी आभार मानले.आणी मोहीमेला पुर्ण विराम दिला.