<
जागतिक छायाचित्र दिनी कॅमेरा पूजन प्रसंगी उदय महाजन, आर्टिस्ट विकास मल्हारा, विजय जैन, तुषार बुंदे, अशोक चौधरी, हिमांशू पटेल, किशोर कुळकर्णी, राजेंद्र माळी, सुनील दांडगे, मुरलीधर बडगुजर, अनिल नाईक आणि आनंद पाटील
जळगाव दि. 19 (प्रतिनिधी) – जैन हिल्स येथे जागतिक छायाचित्र दिन साजरा केला गेला. गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन, आर्टिस्ट विकास मल्हारा, विजय जैन व छायाचित्रकार राजेंद्र माळी यांच्या हस्ते कॅमेऱ्याचे प्रतिनिधीक पूजन करण्यात आले. या प्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी देखील सर्व छायाचित्रकारांना शुभेच्छा दिल्या.
जागतिक छायाचित्र दिवसाच्या कार्यक्रमास राजेंद्र माळी, तुषार बुंदे, हिमांशू पटेल, निवृत्ती वाघ, किशोर कुळकर्णी, सुनील दांडगे, उदय महाजन, अशोक चौधरी, अनिल नाईक मुरलीधर बडगुजर आणि आर्टिस्ट विकास मल्हारा, विजय जैन, आनंद पाटील आदी उपस्थित होते.
जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्याहस्ते कॅमेरा पूजन करून जैन हिल्स येथे पहिल्यांदा जागतिक छायाचित्र दिवस साजरा करण्यात आला होता. जैन इरिगेशनचे विद्यमान चेअरमन अशोक जैन व जैन परिवाराने हा वारसा पुढे चालू ठेवलेला आहे. तेव्हापासून हा दिवस साजरा करण्याचा पायंडा पडला आहे. कंपनीतील सर्व छायाचित्रकार एकत्र येऊन मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करत असतात.
महत्त्वाच्या गोष्टी छायांकीत करण्यासाठी कॅमेरा अत्यंत उपयुक्त साधन आहे. जैन कंपनीच्या इतिहासात देखील विविध कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र जणू दस्तावेजाचे काम करत आहेत. कॅमेरा म्हणजे तिसऱ्या डोळ्याचे महत्त्व आजही अबाधित राहिलेले आहे. काळ बदलला अन् छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाईल अशा प्रवासाला सुरुवात झाली. या बदलत्या काळात छायाचित्र काढण्यासाठी कॅमेरा असायलाचं हवा असे नाही तर आज प्रत्येकांकडे आपला स्मार्टफोन आहे. त्याच्या एका क्लिकवर आपण छायाचित्र आपल्याकडे काढून घेऊ शकतो. जगभरातल्या छायाचित्रकारांना प्रेरणा देणारा दिवस असून त्या निमित्ताने उदय महाजन, विकास मल्हारा यांनी शुभेच्छा दिल्या.