<
बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लियोनी लवकरच दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. नुकतंच अभिनेत्रीने तिच्या सोशल अकाउंटवरुन चाहत्यांना याबाबतची माहिती दिली आहे. मात्र, या चित्रपटाचं शीर्षक काय असणार, याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, सनीने आपल्या फिल्मी करिअरबाबत काही महत्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत.
पण गेल्या काही दिवसांत अचानक सगळं बदललं. जणू करिअरला ब्रेक लागला. आता तर सनीकडे कामचं नाहीये. ना नव्या सिनेमाच्या ऑफर, ना नवे आयटम सॉन्ग. अर्थात सनी खचली नाहीये.
काही वर्षांआधी सर्वांना सनीसोबत काम करायची इच्छा होती. पण आता तिच्या बरोबर काम करायला कुणी तयार होत नाहीये. असं का? एका मुलाखतीत सनी यावर बोलली.
‘जिस्म 2’मधून बॉलिवूड डेब्यू करणा-या सनीचे आजही देशभर चाहते आहेत. पण तिच्या हाताला काम नाहीये. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सनीने ही खंत बोलून दाखवली.
ती म्हणाली, 2012 ची सनी आणि आत्ताची सनी खूप बदललीये. मी आत्ता एक वेगळी व्यक्ती आहे. फिल्म इंडस्ट्रीत मी खूप अपेक्षा घेऊन आले होते. या इंडस्ट्रीचा भाग होऊन आनंदी होते. सगळ्यांकडून खूप प्रेम मिळालं. त्यांची मी आभारी आहे.
पुढे ती म्हणाली, काही लोकांनी मोकळ्या मनाने इंडस्ट्रीत माझं स्वागत केलं. पण काही असं करू शकले नाही. बॉलिवूडचे काही लोक, काही प्रॉडक्शन हाऊसेस अद्यापही माझ्यासोबत काम करण्यास कचरतात. अर्थात यामुळे मला काही फरक पडत नाही.
मी अनुराग कश्यपसोबत नुकताच एक प्रोजेक्ट साईन केला आहे. मी त्याची व त्याच्या टीमची आभारी आहे. तुम्हाला संधी देणाºया माणसाचे मनापासून आभार मानले पाहिजेत. कारण हाच एक क्षण तुमचं आयुष्य बदलतो, असं ती म्हणाली.
खरे तर सनी लियोनीच्या कामाबद्दल सगळेच जाणतात. पण तिच्या स्ट्रगलबद्दल मात्र फार कमी लोकांना माहिती आहे. आपल्या स्ट्रगलिंग काळात सनीने एका जर्मन बेकरीत काम केले होते. याशिवाय तिने एका टॅक्स फर्ममध्येही पार्टटाईम जॉब केला होता.
बेकरीत काम करत असताना सनी पॉर्न इंडस्ट्रीकडे कशी वळली, याचीही एक कथा आहे. सनीची एक मैत्रीण खूप चांगली डान्सर होती. तिनेच लोकप्रिय अॅडल्ट मॅगझिन ‘पेंट हॉऊस’च्या एका फोटोग्राफरशी सनीची ओळख करून दिली.
त्यानंतरच सनीने पॉर्न इंडस्ट्रीत आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांपूर्वी सनी बॉलिवूडकडे वळली. सनीनं एक पहेली लीला, कुछ कुछ लोचा है, रईस, करनजीत कौर द अनटोल्ड स्टोरी OF सनी लियोनी आणि रागिनी एमएमएस रिटर्न्स हे सिनेमे केलेत.