<
साळशिंगी येथील जाहीर सभेत रोहिणीताईचे केले अभिनंदन
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीच्या सौ.रोहिणीताई खडसे यांच्या संकल्पनेतून मुक्ताईनगर मतदारसंघात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्टपासून सुरु असलेल्या जनसंवाद यात्रेला बोदवड तालुक्यात सर्वत्र ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी मॉडेल ठरणारी असून यात्रेदरम्यान मोठया संख्येत सदस्य नोंदणी होत आहे. त्यामुळे आता बोदवड तालुक्यात जिकडे पहा तिकडे फक्त राष्ट्रवादीच दिसत आहे.आदरणीय पवार साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी सर्वांनी रोहिणीताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांनी साळशिंगी येथील जाहीर सभेत केले.
यावेळी बोलतांना भैय्यासाहेबांनी पुढे सांगितले की, संपूर्ण जनसंवाद यात्रेतंर्गत किमान २० हजार नवीन सभासद नोंदणी अपेक्षित आहे आणि ती निश्चितपणे होईल. जनसंवाद यात्रा ही अतिशय यशस्वीरित्या व नियोजनाबध्द राबवली जात असल्याबद्दल सौ.रोहिणीताई खडसेंसह दोन्ही यात्रा प्रमुख ईश्वर रहाणे व निवृत्तीभाऊ पाटील यांचे त्यांनी अभिनंदन केले. बोदवड तालुक्यातील यात्रेचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खास करून तालुकाध्यक्ष आबा पाटील यांचेसह सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले. तसेच नाथाभाऊंनी बोदवड तालुका निर्मितीसह बोदवड उपसा सिंचन योजनेचा घेतलेला निर्णय तालुकावासियांसाठी फार मोठी उपलब्धी असल्याचे भैय्यासाहेबांनी स्पष्ट केले.
यात्रेदरम्यान सौ रोहिणीताईनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गावागावात त्यांना ग्रामस्थांकडून समस्यांचे निवेदनही देण्यात आले. या समस्या नाथाभाऊंच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मदतीने सोडवण्याचे आश्वासन यावेळी रोहिणीताई खडसे यांनी दिले.
यावेळी प्रमोद धमोडे यांनी व्यक्त केलेले मनोगतसुद्धा प्रभावी ठरले. जनसंवाद यात्रेचा उद्देश स्पष्ट करून गेल्या निवडणुकीत ज्या ९० हजार लोकांनी ताईवर विश्वास टाकला. तो विश्वास आणि त्यामुळे आलेली जबाबदारी स्वीकारून जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून रोहिणीताई आपल्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सद्यस्थितीत लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा तळमळीने प्रयत्न करणाऱ्या त्या एकमेव नेत्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
संवाद यात्रेच्या सातव्या दिवशी बोदवड तालुक्यातील करंजी पाचदेवळी, भानखेडा, गोळेगाव, साळशिंगी या गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. यात्रेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील,जिल्हा सरचिटणीस ईश्वरभाऊ रहाणे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पवन राजे पाटील,बोदवड राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आबा पाटील,मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रदिप बडगुजर,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, बाजार समिती संचालक रामदास पाटील,नगरसेवक भरत अप्पा पाटील,रा कॉ चे गटनेते जाफर शेख,लतिफ शेख, दिपक झंबड,कैलास चौधरी, भागवत टीकारे, अनिल वराडे ,अनिल पाटील , हकीम बागवान,माजी सभापती किशोर गायकवाड,विलास धायडे,जिल्हा युवक कॉ. चे संघटक अतुल पाटील, ,युवक तालुका अध्यक्ष विनोद कोळी,जि प सदस्य निलेश पाटील,दीपक वाणी,गोपाळ गंगतिरे,सम्राट पाटील,निलेश पाटील सतिष पाटील,शिवाजी ढोले, विलास देवकर, वामन ताठे, ज्ञानेश्वर पाटील,मधुकर पाटील,डॉ ए एन काजळे,डॉ अतिष चौधरी,विजय चौधरी, निना पाटील,जितेंद्र पाटील, प्रवीण पाटील ,प्रमोद धामोळे, कालू मेंबर,रवी खेवलकर,श्याम पाटील, फिला राजपूत, आनंदा पाटील, नईम बागवान, रणजित गोयंका,प्रदिप साळुंखे, बाळाभाऊ भालशंकर, नंदकिशोर हिरोळे,चेतन राजपूत, भैय्या पाटील, वंदना पाटील,कविता गायकवाड, अश्विनी पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
करंजी पाचदेवळी येथील तुकाराम पाटील, चंद्रकांत चव्हाण, रामराव पाटील, धनराज गायकवाड, पंढरीनाथ पाटील, दिनकर पाटील, आर आर पाटील, वसंत बोरनारे,देवराम पाटील, शालिग्राम पाटील, पंढरी सुरवाडे, अशोक पाटील, काशिनाथ पाटील, अनिल पाटील, प्रल्हाद लोहार, देवराम पाटील, जितू सुरवाडे, उत्तम सुरवाडे, संजय राऊत, सतीश पाटील, विक्रम पाटील, शकील पिंजारी, जिवन सूर्यवंशी, ललित पाटील, तुषार सटाले,दिपक सटाले,वीरेंद्र गायकवाड आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
भानखेडा येथीलरमेश लक्ष्मण मतकर,दिलीप मधूकर मतकर,लालजी पुंडलीक मतकर ,मुकुंद पुंडलीक निकम,ईश्वर राजाराम पाटील,अनिल भास्कर मोरे,स्वप्निल निकम,बाळू रामदास मनूरे,नथ्थू आनंदा शेळके,प्रल्हाद रामदास आवचारे,गौतम कालू सुरवाडे,देविदास तुळशिराम तायडे,विठ्ठल गोबा निकम आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
गोळेगाव येथील अरुण पाटील, कौतिक मतकर, प्रविण पाटील, संदीप पाटील, मनसाराम सुरवाडे, हर्षल गायवाड, रोहित पाटील, कृष्णा पाटील, मयूर पाटील, निखिल पाटील, मोहन इंगळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. साळशिंगी येथील माजी प स सभापती किशोर गायकवाड, विजय चौधरी, बाळू भाऊ पाटील, जितेंद्र चौधरी, विनोद काळबैले,डॉ अतिष चौधरी,संजय पाटील,सरपंच सोनल ताई पाटील, उपसरपंच सोनल ताई गायकवाड,सचिन मोते, दिलीप महाजन, जितेंद्र गायकवाड, वामन मोरे, सागर पाटील, राहुल पाटील,संदिप गायकवाड, सुरजमल सोनवणे, ब्रिजलाल सोनवणे, जंगलु मोरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.