<
यावल-(प्रतिनिधी) – दिनांक 25/08/2022 रोजी मा. श्री.डिंगबर पगार वनसंरक्षक धुळे वनवृत्त मा.श्री.पद्मनाभ एच एस उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगांव, मा. श्री.प्रथमेश हाडपे सहाय्यक वनसंरक्षक यावल यांच्या मार्गदर्शनाने गुप्त बातमीनुसार वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व आणि वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर प्रादेशिक यांनी संयुक्तरीत्या मौजे सावदा नगरपालिका हद्दीतील शिवगंगा नगर मधील श्री. गणेश कोळी यांच्या मालकी चे बांधकाम चालू असलेल्या घरात अवैधरित्या विनापरवाना,विनानिर्गत पासेस,विनाशिक्काचे मौल्यवान साग इमारती चौरस लाकूड नग-११८, घ.मी-१.७४१,किंमत १,५६,०००/ रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.
चौकशी दरम्यान लाकूड मालक आरोपी नामे नंदुकिशोर अरुण चोपडे रा.निबोरा स्टेशन,रावेर यांनी नविन घरबांधनी व फर्निचर तयार करीत अवैध विक्रीकरण्यासाठी साग लाकडे अवैध वाहतुक करुन घरा मध्ये दडवून ठेवला होता.सदर कार्यवाहीत वनक्षेत्र रावेर मधील वनपाल रावेर यांनी भारतीय वन अधिनियम 1927 आणि महाराष्ट्र वन नियमावली 2014 अन्वये प्रथम रिपोर्ट क्रमांक 05/2022 चा वनगुन्हा नोंद केला. सदरील सागवान माल जप्त करून पुढील तपास चालू आहे. या कार्यावाहीत श्री विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल ,श्रीअजय बावणे वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर, वनपाल- श्री रवींद्र सोनवणे,वनरक्षक- श्री गोवर्धन डोंगरे, श्री.कृष्णा शेळके, श्री. भैय्यासाहेब गायकवाड , श्री.संभाजी सूर्यवंशी, श्री राजू बोंडल, श्री युवराज मराठे श्रीमती आयशा पिंजारी, श्रीमती कल्पना पाटील, श्रीमती सविता वाघ,श्रीमती अरुणा ढेपले वाहन चालक श्री. चव्हाण, श्री.विनोद पाटील आणि
अधिसंख्य वनमजूर यांनी संयुक्तरीत्या कार्यवाही केली.