गेल्यावर्षी परीक्षेचे पेपर फुटल्याने तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रद्द केलेली ‘गट क’ ची आरोग्य भरती परीक्षा आता होणार असून या भरतीसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांनीं परीक्षेसाठी तयारीला लागा कारण राज्यशासनाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करून तारीख सुद्धा जाहीर केली आहे.
आरोग्य विभागातील गट क च्या सप्टेंबरदरम्यान परीक्षा घेण्यासाठी पाच संवर्गातील भरती परीक्षेचे कंपनीची निवड करण्यात येणार आहे. वेळापत्रक जाहीर झाले आहे. येत्या १५ आणि १६ ऑक्टोबरला ही परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. नवीन कंपनीची नेमणूक करून ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
ग्रामविकास विभागाकडून आरोग्य विभागाच्या गट क मधील आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पाच संवर्गातील भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बिंदुनामावली अंतिम आहे.
जिल्हा निवड समितीने प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजनाची कार्यवाही करण्यासाठी २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर वेळ दिला आहे. तर, जिल्हा निवड समितीने उमेदवारांचे प्रवेशपत्र तयार करून ते उमेदवारांनी डाऊनलोड करून घेण्यासाठी ५ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर, संगणकीय पद्धतीने परीक्षा १५ आणि १६ ऑक्टोबरला, तर उत्तरतालिका प्रसिद्ध करून उमेदवारांच्या हरकती सूचना घेणे, अंतिम निकाल जाहीर करून नियुक्ती आदेश देण्यासाठी १७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरची मुदत देण्यात आली.