Sunday, July 20, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जनतेचं प्रेम विकत घेऊच शकत नाही – आ.अमोल मिटकरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/08/2022
in राजकारण
Reading Time: 1 min read


मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा पवार साहेबांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजयी झालेला तुमचा आमदार, जो पवार साहेबाना झाला नाही, स्वतःला बाळासाहेबांचा कडवा शिवसैनिक म्हणवणारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंना झाला नाही… तो आता बंडखोर शिंदे गटात सामील झाला आहे, हा आमदार थोड्याच दिवसात भाजपात गेल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागताच १६ बंडखोरांवर अपात्रतेची कारवाई होऊन राज्यातील असंविधानिक सरकार कोसळेल.पन्नास खोके एकदम ओक्के” यात काय दडलंय हे सारी जनता जाणून आहे.  आगामी निवडणुकीत राज्यातील जनता गद्दारांना माफी करणारच नाही.” या मतदार संघातही आमदार चंदू पाटीलको करारा जबाब मिलेगा….. असे सांगून ५० खोके घेऊन ते जनतेचं प्रेम विकत घेऊच शकत नाही. पुढील काळात भैय्यासाहेब आणि नाथाभाऊंवर प्रेम करणाऱ्या जनसामान्यांनी नाथाभाऊप्रमाणेच करारी बाणा असलेल्या रोहिणीताई खडसेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे, असे आवाहन विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले. रोहिणीताई खडसे यांच्या संकल्पनेतून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील १८२  गावांमध्ये अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्टपासून जनसंवाद यात्रा सुरु आहे. यात्रेच्या आठव्या दिवशी शेलवड ता. बोदवड येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, सध्या देशात जे सुरु आहे, ते लोकशाहीला अतिशय घातक आहे. लोकशाहीची पायमल्ली करून आता जळी -स्थळी -काष्टी -पाषाणी, अक्षरशः चंद्रावर सुद्धा भाजपाचेच सरकार असावे यासाठी अघोरी प्रयत्न सुरु आहेत. ईडी, सीबीआय, आयटी आदी संस्था हाताशी धरून मोदी सरकारने विरोधक संपवण्याचे काम चालवले आहे. ज्या किरीट सोमय्याने याआधी प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, भावना गवळी यांचेवर आरोप केले, ही मंडळी शरण जाताच तो आता गुपचूप बसलाय हे समजण्याइतपत जनता खुळी नाही. महागाई, बेरोजगारी याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही.असा आरोप त्यांनी केला.

यावेळी सरकारमध्ये शिंदे गटासह भाजपा मध्ये आमदारंमध्ये प्रचंड नाराजी आहे.  मलाईचे खाते मिळाले नाही म्हणून मंत्री नाराज, तर मंत्री पद मिळाले नाही म्हणून आमदार नाराज… अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच कोर्टामध्ये अपात्रतेची टांगती तलवार १६ सदस्यांवर आहे… निकाल लागताच राज्यातील सरकार कोसळणारच असा दावा, मिटकरी यांनी केला. याप्रसंगी मंत्री तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, मंत्री संदीपान भुमरे यांच्या दौऱ्यावरही टीका केली.

भारत देश कृषी प्रधान असून शेती करणारे सगळेच लोक हिंदू आहेत. हाच हिंदू समाज धोक्यात आला आहे. बियाणे,खते आणि फवारणीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. शेत मालाला भाव नाही… अनेक जण कर्जबाजारी झाल्याने जीवनयात्रा संपवत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हिंदुत्वाचा सत्तेसाठी वापर करणार्यांना हे हिंदुत्व दिसत नाही का?? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. संपूर्ण भाषणात शेर शायरी करत त्यांनी तुफान फटके बाजी करून सभा जिंकली.

२०१९ च्या निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी लढवत असतांना सौ रोहिणीताई खडसें अवघ्या १८०० मतांनी पराभूत झाल्यात. त्यांचा झालेला पराभव एका दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडला. कारण त्या पराभूत झाल्या नसत्या तर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला नसता. त्यांच्या रूपाने रा. कॉ. नेत्या सुप्रियाताई सुळे यांचे प्रमाणेच कणखर, लढवय्ये, आक्रमक आणि जनसेवेसाठी तत्पर असं नेतृत्व राष्ट्रवादीला मिळालं आहे. ज्या नाथाभाऊनी पक्षवाढीसाठी जीवाचे रान केले, त्याच पक्षाने त्यांना पक्ष सोडण्यासाठी भाग पाडले, अजूनही एकाच प्रकरणाची पुन्हा पुन्हा चौकशी लावून त्यांची छळवणूक सुरु आहे.

आता पवार साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादीमय करण्याची जबाबदारी नाथाभाऊंवर आहे. आगामी जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकित हे सिद्ध होईल. प्रसंगी कोणत्याही निवडणुका नसताना रोहिणीताईनी सुरु केलेल्या जनसंवाद यात्रेबद्दल अभिनंदन करून ही यात्रेची संकल्पना राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल असा आशावाद व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बोदवड तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी केले.याआधी जिल्हायुवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रविंद्र नाना पाटील, जि प सदस्य रामदास पाटील यांनी मनोगते व्यक्त केलीत.यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड भैय्यासाहेब रवींद्र पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर, माफदाचे अध्यक्ष विनोद भाऊ तराळ, महिला आघाडी अध्यक्षा वंदनाताई चौधरी, युवक अध्यक्ष रविंद्र नाना पाटील,  जिल्हा सरचिटणीस ईश्वर भाऊ राहणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती  निवृत्तीभाऊ पाटील,  VJNT सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपानराव पाटील, जामनेर तालुका अध्यक्ष विलास भाऊ राजपूत, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यू डी पाटील सर, बोदवड तालुका अध्यक्ष आबा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रामदास भाऊ पाटील, शेलवड नगरीचे सरपंच समाधान भाऊ बोदडे, उपसरपंच रामदास भाऊ माळी, राजाराम भाऊ जवरे, रामभाऊ म्हस्के, अशोक सोन्नी,  राजू पाटील, ईश्वर वाणी, कडू माळी , समाधान राऊत, वामन म्हस्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जनसेवेसाठी सदैव तत्पर – रोहिणीताई खडसे

Next Post

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

Next Post

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

Private:

माध्यमिक शिक्षण विभागाला माहिती अधिकार कायद्याचा विसर – ॲड. दिपक सपकाळे

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Private:

दहिगाव ग्रामपंचायत कडून माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications