<
क्रूरतेचा कळस गाठणारी घटना उघडकिस आली असून मनुष्याला एवढ्या खालच्या स्तराला जाऊन क्रूरता करण्यात कुठली धन्यता वाटत असावी असा प्रश्न मनात निर्माण होतो. माणसाच्या मनाला चटका लावणारी ही घटना आहे.या प्रकरणी झारखंडचे सेवा निवृत्त आयएएस अधिकारी बीबी पात्रा व त्यांच्या पत्नी सीमा पात्रा यांना अटक करण्यात आली आहे. सीमा पात्रा यांच्यावर ८ वर्षांपासून घरातील नोकराचा छळ केल्याचा आरोप आहे. गेल्या ८ वर्षांपासून सीमा यांच्या घरी एक अपंग मुलगी काम करत होती,सीमा या मुलीला बेदम मारहाण करत असे. पीडित महिलेला आपल्या जीभेनं चाटून शौचालय स्वच्छ करण्यास भाग पाडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
सीमा पात्रा पळून जाण्याच्या तयारीत होत्या तेवढ्यात पोलिसांनी पकडलं
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ४ वाजता रांचीमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सीमा पात्राला अर्गोरा पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस सीमा पात्राचा शोध घेत होते. मंगळवार येथील सीमा येथे घरगुती मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या सुनीताचा जबाब न्यायालयात नोंदवण्यात आला.
अटकेच्या भीतीने सीमा पात्रा पळून गेली होती. गेल्या 2 दिवसांपासून रांची पोलीस सीमा पात्राचा ठिकठिकाणी शोध घेत होते. अनेकवेळा पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले होते.
भाजपातून हकालपट्टी…
सीमा पात्रा यांच्या बाबत मंगळवारी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर भाजपने सीमा पात्रा यांची पक्षातून हकालपट्टी केली.
गेल्या आठ वर्षपासून मोलकरीणचा छळ…
सीमा पात्रा रांचीच्या अशोक नगर येथील घरात मागील आठ वर्षांपासू आदिवासी महिला सुनीता यांचा छळ करत होत्या. सीमावर महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सुनीताच्या अंगावर जखमांच्या अनेक खुणा दिसल्या आहे.
आईचे क्रूर कृत्य मुलानेच केले उघड…
सीमा यांचा मुलगा आयुष्मान याचा मित्र विवेक बस्के याने महिलेला मदत केली. आयुष्माननेच विवेकला सांगितले की त्याची आई सीमा घरकाम करणाऱ्या सुनीतावर कसा छळ करते. आयुष्मानने विवेकला याबाबत सांगितल्यावर त्याने पोलिसांच्या मदतीने सुनीताची सुटका केली. विवेक सचिवालयात कार्यरत आहे.